Sukesh Chandrashekhar : "तू एलिगेंट, क्लासी, सुपर-हॉट"; सुकेशचं जॅकलिनला 'लव्ह लेटर', बर्थडेला देणार 'सुपर सरप्राईज'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 03:35 PM2023-05-07T15:35:56+5:302023-05-07T16:01:05+5:30

Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez : महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक नवीन लव्ह लेटर लिहिलं आहे.

200 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दिल्लीच्या मंडोली तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला एक नवीन लव्ह लेटर लिहिलं आहे. त्याने आपल्या पत्राल वाढदिवशी जॅकलिनला सुपर सरप्राईज देणार असल्याचं म्हटलं आहे.

सुकेश चंद्रशेखरचा दावा आहे की, अभिनेत्री जॅकलीन त्याची गर्लफ्रेंड आहे आणि ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. सुकेश आणि जॅकलिनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एजन्सीने जॅकलिनची अनेकदा चौकशी केली आहे. जॅकलिनला लिहिलेल्या नवीन पत्रात सुकेशने लिहिले की, तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी एक सुपर सरप्राईज तयार आहे. यासोबतच सुकेशने आणखी काही गुपितं उघड केली. त्याबद्दल जाणून घेऊया...

'माय लव्ह, माय बेबी जॅकलिन, मी 28 एप्रिलला फिल्मफेअर अवॉर्ड पाहिला, मला वाटतं तू उत्कृष्ट होतीस आणि तुझा परफॉर्मन्स सर्वोत्तम होता. संपूर्ण शोमध्ये तुझा डान्स शोस्टॉपर होता. तू एलिगेंट, क्लासी, सुपर-हॉट आहेस. तू मला पुन्हा तुझ्या प्रेमात वेड केलंस."

"माझ्याकडे शब्द नाहीत, तू सुपरस्टार आहेस. तू माझ्या आयुष्यात आल्याने मी धन्य झालो" असेही पत्रात लिहिले आहे. "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, प्रत्येक सेकंद तुझ्यासाठी आहे, तुला माहीत आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो, तू माझ्यावर किती प्रेम करते हे देखील माहीत आहे."

पत्रात सुकेशने पुढे लिहिले की, "मला तुझी खूप आठवण येते. तुझ्या वाढदिवशी माझ्याकडे एक सरप्राईज आहे, तुला ते आवडेल. मी माझे वचन पाळत आहे. वाट पाहू शकत नाही. तू हसत राहावं एवढीच माझी इच्छा आहे. मी इथे आहे. काळजी करू नको." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

विशेष म्हणजे गेल्या महिन्यात सुकेशने जॅकलिनला पत्रही लिहिलं होतं. त्यात सुकेशने जॅकलिनला ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पत्राची जोरदार चर्चा रंगली होती. सुकेशने तुरुंगातून एक पत्र लिहिले आहे त्यामध्ये, "बेबी, मी तुला ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा देतो! हा तुझ्या वर्षातील सर्वात आवडत्या सणांपैकी एक आहे."

"मला तुझी आठवण येते. मी तुझ्यातला तो बालिशपणा खूप मिस करत आहे. कशी तू अंडी फोडतेस आणि आतून कँडीज बाहेर काढतेस. बेबी, तू किती सुंदर आहेस याची तुला कल्पना आहे का? तुझ्यासारखे सुंदर या ग्रहावर दुसरं कोणीच नाही. माय बनी रॅबिट, मी तुझ्यावर प्रेम करतो" असं म्हटलं होतं.

"बेबी ही फेज संपणार आहे आणि आता ते चांगले होईल हे प्रत्येकजण पाहणार आहे. बेबी असा एकही क्षण नाही जेव्हा मी तुझ्याबद्दल विचार करत नाही आणि मला माहीत आहे की तुझ्या बाबतीतही असेच आहे. माय हनी बी तुझ्या सर्वात सुंदर हृदयात काय आहे हे मला माहीत आहे."

"मी वचन देतो की पुढचा ईस्टर तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम ईस्टर असेल. बेबी मी आपल्याबद्दल विचार करत होतो जेव्हा मी लक्स कोझीची तुझी नवीन जाहिरात पाहिली. ही जाहिरात निव्वळ योगायोग आहे, पण तू खूप सुंदर आहेस बेबी" असंही सांगितलं होतं.

एका गाण्याच्या ओळींचा उल्लेख केला होता. 'तुम मिले, दिल खिले और जीने को क्या चाहिए' लिहिलं होतं. पुढे सुकेश म्हणाला, "बेबी तू माझ्या हृदयाची धडधड आहेस. माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. बेबी, आई, वडील आणि कुटुंबाला पुन्हा एकदा ईस्टरच्या शुभेच्छा. देव आशीर्वाद देवो! बेबी माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझा जॅकी बोम्मा."

विशेष म्हणजे सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पत्र लिहिलं होतं. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं - "माय बेबी जॅकलीन, माय बोम्मा, आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला खूप मिस करत आहे."