ब्यूटी विद ब्रेन! कॅनडा, जर्मनीची नोकरी सोडून 'ती' झाली IPS; IAS सोबत थाटला संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 02:47 PM2023-03-11T14:47:12+5:302023-03-11T14:54:38+5:30

IPS Pooja Yadav Success Story: पूजा यादव यांना आयपीएस अधिकारी होण्याचा निर्णय घेणे खूप कठीण होते.

यूपीएसी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची गोष्ट खास आहे. काही जण खडतर संघर्ष करून इथपर्यंत पोहोचतात, तर काहींनी आपल्या चांगल्या नोकऱ्या सोडून इथे येण्याचा पर्याय निवडला. IPS पूजा यादव यांचीही अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे. इथे येण्यापूर्वी त्यांनी परदेशी नोकरी सोडली.

पूजा यादव यांना आयपीएस अधिकारी होण्याचा निर्णय घेणे खूप कठीण होते. कारण त्य़ा त्यांची यशस्वी कारकीर्द सोडून पुढे जात होत्य़ा. पूजा यांच्या कुटुंबाने पाठिंबा दिला. पूजा यांची सक्सेस स्टोरी जाणून घेऊया...

पूजा यादव या मूळच्या हरियाणाच्या आहेत. 20 सप्टेंबर 1988 रोजी जन्मलेल्या पूजा यादव यांनी हरियाणामधून सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यांनी बायोटेक्नॉलॉजी अँड फूड टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक केले. एमटेक केल्यानंतर त्या कॅनडाला गेल्या.

काही वर्षे कॅनडामध्ये काम केल्यानंतर त्या जर्मनीला गेल्या. परदेशी नोकरीत पैसा होता, सोयी होत्या. पण पूजा यांचे समाधान झाले नाही. नोकरी सोडून त्या भारतात परत आल्या. भारतात आल्यानंतर पूजा यादव यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाल्या. त्यानंतर दुप्पट मेहनत घेऊन दुसऱ्या प्रयत्नात 174 वा क्रमांक (IPS Pooja Yadav Rank) गाठला. पूजा यादव या 2018 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत.

पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. हरियाणामध्ये बालपण गेलेल्या पूजा यादव यांची गणना देशातील सर्वात सुंदर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. 2018 बॅचच्या आयपीएस अधिकारी गुजरात केडरमधील अधिकारी आहेत.

पूजा यांना आयपीएस अधिकारी होण्याचा निर्णय घेणे खूप कठीण होते. कारण त्य़ा त्यांची यशस्वी कारकीर्द सोडून जात होत्या. पूजाच्या कुटुंबाने पाठिंबा दिला. खर्च भागवण्यासाठी रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केले.

पूजा आणि 2016 च्या बॅचचे IAS अधिकारी विकल्प भारद्वाज यांचे 2021 साली लग्न झाले. ते केरळ केडरचे अधिकारी आहेत. पूजाशी लग्न केल्यानंतर त्यांनी गुजरात केडरमध्ये बदलीची विनंती केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.