सचिननं शाळांच्या बांधकामासाठी दिला लाखोंचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 22:49 IST2018-03-30T22:48:59+5:302018-03-30T22:49:25+5:30

मुंबईतल्या शिवडीमधील गुरू गोविंद सिंग तेज बहादूर शाळेला सचिननं भेट दिली आहे.
यावेळी सचिननं विद्यार्थ्यांसोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्या आहेत.
राज्यसभेत खासदार असलेल्या सचिननं या शाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी दिला आहे.
सचिन तेंडुलकरने जम्मू-काश्मीरमधील शाळेसाठी 40 लाख रुपयांची मदत दिली आहे.
सचिनने दिलेल्या या निधीतून कुपवाडामधल्या शाळेत 10 क्लास रूम, 4 प्रयोगशाळा, प्रार्थना हॉल, सहा शौचालये बांधण्यात येणार आहे.