सध्या जितकी उष्णता आहे तितकी गेल्या २००० वर्षात नव्हती; वैज्ञानिकांनी दिला मोठा इशारा! पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 06:57 PM2023-03-23T18:57:54+5:302023-03-23T19:02:38+5:30

संपूर्ण जग सध्या भनायक हवामान संकटाकडे वाटचाल करत आहे. अनेक देशांमध्यु दुष्काळाची परिस्थिती आहे. कारण गेल्या ५० वर्षात जितकं तापमान वाढलंय तितकं २ हजार वर्षात कधीच वाढलेलं नाही. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण गेल्या २० वर्षात सर्वोच्च पातळीवर आहे. हवामान संकटाचा टाइम बॉम्ब केव्हाही फुटू शकतो.

संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी म्हटलं की हवामान संकटाचा टाइमबॉम्ब फुटला तर जगातील अनेक देशांमध्ये भयाण परिस्थिती उद्भवेल. कारण वाढत्या तापमानामुळे हिमनग वितळतील. नद्या आटून जातील आणि शेतीसाठी अजिबात पाणी उरणार नाही. आपल्याकडे आता खूप कमी वेळ बाकी आहे जेणेकरुन पृथ्वीला मोठ्या संकटातून वाचवू शकतो.

IPCC च्या सिंथेसिस रिपोर्टचा दाखला देत अँडिनियो यांनी सांगितलं की हा अहवाल मनुष्याजात वाचवण्यासाठीचं मार्गदर्शक आहे. सर्व विकसीत देश २०४० पर्यंत झीरो उत्सर्जनचं लक्ष्य पूर्ण करायला हवं असं म्हटलं आहे.

हजारो पानांची IPCC एआर-६ रिपोर्ट संक्षिप्त स्वरुपात करुन ३७ पानांमध्ये सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टनसार २०३० पर्य़ंत कार्बन उत्सर्जन अर्ध्यावर आणावं लागणार आहे. जेणेकरुन तापमानात जास्तीत जास्त १.५ डिग्रीच वाढ होऊ शकेल.

IPCC चे प्रमुख होसंग ली यांनी सांगितलं की आपण जर आतापासूनच काम सुरू केलं तर आफल्याकडे आताही वेळ आहे की आपण तापमान जास्त वाढू देऊ नये. सध्याचं तापमान १९०० सालच्या तुलनेत १.१ डीग्री सेल्सियसनं जास्त आहे.

२०१८ साली आयपीसीसीनं इशारा दिला होता की कार्बन उत्सर्जन २०३० पर्यंत अर्ध्यावर आलं पाहिजे. यात जर यश आलं तर वाढणाऱ्या तापमानाला १.५ डीग्री सेल्सियसपर्यंत रोखता येऊ शकेल. पण असं काहीच सध्या होताना दिसत नाहीय. तापमान सातत्यानं वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय एजन्सीच्या माहितीनुसार गेल्या वर्षातच उष्णतेत १ टक्क्यानं अधिक वाढ झालीय. जगभरातील सरकारांना आता आपलं कार्बन बजेट वाढवावं लागणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करत जाणं भाग आहे. नाहीतर जागतिक तापमान वाढीमुळे अनेक आपत्तींना तोंड द्यावं लागेल.

प्रत्येक देशानं आता जीवाश्म इंधनात कपात करावी लागणार आहे. हरित ऊर्जेवर भर द्यावा लागणार आहे. तसंच लो-कार्बन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्यावं लागेल. शेती आणि जंगलांची वाढ करावी लागेल.

जर जगाचं तापमान १.५ डीग्रीनं वाढलं तर काय होईल याचीही माहिती अहवालात देण्यात आली आहे. हवामान बदलामुळे जमीन, समुद्र आणि हिमनगांवर परिणाम होईल. या रिपोर्टमध्ये तशी नवी कोणतीच गोष्ट नाही. याआधीचेच निष्कर्षांचं विश्लेषण करुन नव्यानं सादर करण्यात आलं आहे.

अहवालात इशारा देण्यात आला आहे की ज्यापद्धतीनं जागतिक तापमान वाढीचे शिकार आपण होत आहोत ते पुन्हा व्यवस्थित करणं आता शक्य नाही. जागतिक तापमान वाढ संपूर्ण पृथ्वीवर भयानक बदल होतील. यानं अशा आपत्ती येतील ज्यांपासून वाचणं अशक्य आहे. सिंथेसिस रिपोर्टचा बहुतांश भाग भविष्यातील अडचणींना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आला आहे.