ना कसला पगार घेतात, ना विमा पॉलिसी; खात्यात फक्त 574 रु.! जाणून घ्या, किती श्रीमंत आहेत PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 09:47 PM2023-11-12T21:47:26+5:302023-11-12T22:13:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी कसलाही पगार घेत नाहीत. ते संपूर्ण रक्कम दान करतात...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. यानुसार, आता त्याच्याकडे आता कुठल्याही प्रकारची जीवन विमा पॉलिसी नाही. त्यांची विमा पॉलिसी मॅच्युअर झाल्याची पूर्ण शक्यता आहे. यातून जे काही पैसे मिळाले, ते त्यांनी आपल्या एफडी खात्यात जमा केले आहेत.

या नव्या घोषणेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालमत्तेत एक एफडी आणि एका राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा समावेश आहे. या वर्षाच्या 31 मार्चपर्यंत, त्यांच्या एसबीआय गांधीनगर शाखेतील एफडी खात्यात 2.47 कोटी रुपये होते. गेल्या वर्षभरात या खात्यात 37 लाख रुपयांची वाढ झाली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेनुसार, त्यांच्याकडे कुणाचेही देणे नाही. त्यांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातही 14,500 रुपयांची वाढ झाली आहे. 31 मार्च 2023 रोजी त्याचे NSC मूल्य 9.19 लाख रुपये एवढे होते.

पीएम मोदींकडे ना कसल्या प्रकारचे कर्ज आहे, ना वाहन आहे, ना जमीन आहे. त्यांच्याकडे 20,000 रुपयांचे बॉन्ड होते. बँक बॅलन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, पीएम मोदींकडे केवळ 574 रुपये आहेत. या वर्षी 31 मार्च रोजी त्यांच्याकडे 30,240 रुपये रोख होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कसलाही पगार घेत नाहीत. ते संपूर्ण रक्कम दान करतात. त्यांचे केवळ एक बँक खाते आहे, जे एसबीआय गांधीनगर शाखेत आहे. हे खाते, ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आहे.

महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्री त्यांची आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची संपत्ती आणि देणे स्वेच्छेने घोषित करत असतात. खरे तर, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात याला झाली होती.