New Toll System: टोल नाक्यांवर आता फास्टॅगची गरज नाही; सरकार लवकरच करणार मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 01:42 PM2022-12-19T13:42:41+5:302022-12-19T13:46:47+5:30

ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन ऑफ इंडिया आणि IIM कोलकाताच्या एका रिपोर्टनुसार, टोल नाक्यांनावर गाड्या थांबल्याने सूमारे 1 लाख कोटी इंधन वाया जाते.

New Toll System: तुम्ही टोलनाक्यावर थांबून टोल भरत आसाल, तर आता हा टोल भरण्याची गरज नाही. भारत सरकारकडून वाहने आणि लोकांची ये-जा सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर नवीन टोल प्रणाली लागू करण्याची योजना आखली जात आहे. सरकार ANPR (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर) कॅमेऱ्याच्या मदतीने नवीन GPS-आधारित टोल सिस्टीम लागू करण्याच्या विचारात आहे.

एएनपीआर वाहनाची लायसेन्स प्लेट रीड करेल आणि थेट कार मालकाच्या बँक खात्यातून पैसे कट करेल. टोल प्लाझाची एंट्री आणि एक्झीटवर हे एएनपीआर कॅमरे बसवले जातील आणि यातून गाड्यांचे नंबर कॅप्चर केले जातील. ट्रॅफिकर कमी करण्यासाठी सध्याच्या FASTags सिस्टीमला ANPR प्रणाली एक चांगला पर्याय ठरू शकतो.

ट्रांसपोर्ट कॉरपोरेशन ऑफ इंडिया आणि IIM कोलकाताच्या एका रिपोर्टनुसार, टोल नाक्यांनावर गाड्या थांबल्याने सूमारे 1 लाख कोटी इंधन वाया जाते. याशिवाय, टोल प्लाझावर गाड्या थांबल्याने उशीर होतो आणि यातून 45 हजार कोटींचे नुकसान होते. म्हणजे, एकूण 1 लाख 45 हजार कोटी रुपयांचे वर्षाला नुकसान होते. अशा मोठ्या आर्थिक संकटातून देशाला वाचवण्यासाठी लवकरच GPS सिस्टीम सुरू करण्याची गरज आहे.

या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने गाड्यांची नंबर प्लेट स्कॅन केली जाईल आणि थेट कार मालकाच्या बँक खात्यातून पैसे कट होतील. या नवीन तंत्रज्ञानाची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या वर्षी संसदेत दिली होती. यामुळे टोल प्लाझांवर होणारी आर्थिक गडबड थांबवली जाईल. या तंत्रज्ञानची वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही हायवेवर जितके किलोमीटर गाडी चालवाल, तितकाच टोल वसूल केला जाईल.

हे तंत्रज्ञान आल्यानंतर गाड्यांमध्ये बसवली जाणारी नंबर प्लेट सामान्य नसेल, यात GPS सिस्टीम बसवलेली असेल. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने नवीन गाड्यांमध्ये जीपीएस नंबर प्लेट लावण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, जुन्या गाड्यांमध्येही अशाप्रकारच्या जीपीएस नंबर प्लेट बसवल्या जातील.