'माझी आई निरक्षर, तिने शाळेचा दरवाजाही पाहिला नाही, पाहिली ती फक्त गरिबी'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 12:24 PM2022-06-18T12:24:25+5:302022-06-18T13:35:24+5:30

आमच्या घराला ना खिडकी होती, ना शौचालय, ना बाथरुम. त्याच एका घरात आई-वडिल आणि आम्ही भावंडं राहत होतो. घरात अनेक गोष्टीचा अभाव होता, पण आई-वडिलांनी त्याचा तणाव कधी जाणवू दिला नाही, अशी आठवण मोदींनी आपल्या लेखात सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर असलेल्या मोदी देखील गुजरात दौऱ्यावर आहेत.

नरेंद्र मोदींनी आज सकाळी-सकाळीच गांधीनगर येथील घरी आईचे पाय धुवून दर्शन घेतले. तसेच, मातोश्रींसमवेत घरातील देवांची पूजा-आरतीही केली. सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा देत मोठा ब्लॉग लिहिला असून तो ट्विटवरुन शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये त्यांनी लहानपणीची गरिबी आणि आईचे संस्कार, शिकवण यांतून घडलेला प्रवास उलगडला आहे.

नरेंद्र मोदींनी माँ, Mother या मथळ्याखाली मोठा ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आईला 100 वर्षे जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आठवणी जागवल्या.

आई हिराबेन यांच्या बालपणापासूनचा प्रवास मोदींनी शब्दांतून उलघडला आहे. त्यांच्या मातोश्रींनी भोगलेली गरिबी, घेतलेले कष्ट आणि लेकरांचा केलेला सांभाळ याची आठवण मोदींनी केली.

मोदींनी वडिलांच्या जन्मशताब्दीची पूर्ती आणि आईच्या जन्मशताब्दीची सुरूवात याच वर्षात झाल्याचं सांगितलं. तसेच, आमच्या घरी कधीही वाढदिवस साजरा होत नसे. पण, नवी पिढी आता हे करतेय, असे मोदींनी म्हटले.

माझ्या आयुष्यात आज ते काही चांगलं आहे, माझ्या व्यक्तिमत्वाते जे काही चांगलं आहे, ते केवळ माझ्या आई-वडिलांनी देन आहे. आज मी दिल्लीत असतानाही किती जुन्या गोष्टी आठवणीत येतात.

आज मी माझ्या आईबद्दल लिहत आहे, माझ्या आईने लहानपणीच तिची आई गमावली. तिला बालपणी आईची सावली, प्रेम लाभलंच नाही. माझ्या आईचा जन्म मेहसाणा जिल्ह्यातील वीसनगर येथे झाला.

वडनगरपासून हे गाव जास्त दूर नाही. पण, माझ्या आईला आईचं सुख मिळालं नाही. ती आईकडे कधी कुठला हट्ट करू शकली नाही. आईच्या कुशीत झोपू शकली नाही.

माझी आहे निरक्षर आहे, तिने शाळेचा दरवाजाही कधी पाहिला नाही. तिने पाहिली ती फक्त गरिबी आणि घरात सर्वच गोष्टींचा अभाव. तरीही आज त्या परिस्थितीची आठवण करताच, आई म्हणते ती ईश्वराचीच इच्छा असेल.

बालपणीच्या संघर्षांनीच माझ्या आईला लहानपणी मोठं केलं होतं. ती कुटुंबात सर्वात मोठी होती आणि लग्न झाले तेव्हाही घराती सर्वात मोठी सून होती. वडनगरमध्ये एक-दीड खोल्याचं आमचं घर होतं.

आमच्या घराला ना खिडकी होती, ना शौचालय, ना बाथरुम. त्याच एका घरात आई-वडिल आणि आम्ही भावंडं राहत होतो. घरात अनेक गोष्टीचा अभाव होता, पण आई-वडिलांनी त्याचा तणाव कधी जाणवू दिला नाही, अशी आठवण मोदींनी आपल्या लेखात सांगितली.