भारतीय व परदेशी फुलांनी सजलेलं मुघल गार्डन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 03:06 PM2018-02-06T15:06:34+5:302018-02-06T15:12:26+5:30

तुम्ही या महिनाभरात दिल्लीत जाणार असाल, तर राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पाहण्याची तुम्हाला संधी आहे.

पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील.

एकट्या गुलाबाच्याच तिथे १५0 हून अधिक जाती आहेत, शिवाय कधीच न पाहिलेली फुले आणि त्यांची झाडे तिथे आहेत.

मुघल गार्डन आज, ६ फेब्रुवारीपासून ९ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

दर सोमवारी ते देखभालीसाठी बंद राहील आणि २ मार्च रोजी होळीनिमित्तही ते बंद राहणार आहे. आणि हो, ते पाहण्यासाठी कोणतेही तिकीट नाही.