केरळ, तामिळनाडूला ओखी चक्रीवादळाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 04:29 PM2017-12-01T16:29:54+5:302017-12-01T16:34:10+5:30

भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.

ओखी चक्रीवादळात तामिळनाडूतील चार आणि केरळमधील चार अशा एकूण 8 जणांना मृत्यू झाला आहे

केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप बेटावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोच्ची आणि लक्षद्वीप बेटासाठी नौदलाच्या दोन नौका तैनात करण्यात आल्या आहेत.