राम मंदिराचे काम किती झाले? अयोध्येतील बांधकामाचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 03:15 PM2023-12-08T15:15:42+5:302023-12-08T15:30:32+5:30

अयोध्येत अनेक महिन्यांपासून भव्य राम मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. ८० टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याआधी अयोध्या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या उभारणीची नवीन फोटो प्रसिद्ध केले आहेत.

काशीचे पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात पूजा करतील. ८६ वर्षीय दीक्षित यांचे काशीचे प्रसिद्ध विद्वान पंडित गंग भट्ट यांच्याशी कनेक्शन आहे, त्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता.

राम मंदिराच्या तळमजल्याचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या ७० खांबांवर शिल्पाचे काम सुरू आहे.

प्रभू राम मंदिराच्या उभारणीत गुंतलेल्या कामगारांना २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. तेही रामललाच्या प्रतिष्ठेचे साक्षीदार बनतील. ट्रस्टच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राम मंदिर ट्रस्ट राम लल्ला मंदिराला आकार देणाऱ्या कार्यकर्त्यांनाही आमंत्रित करण्याचा विचार करत आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी किमान ४००० संतांना आमंत्रित केले जात आहे. यादी तयार आहे आणि ५० देशांपैकी प्रत्येकी एक प्रतिनिधी यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, अयोध्येत तीन ठिकाणी रामजन्मभूमी मंदिरातील प्रभू रामाच्या पाच वर्षांच्या बालस्वरूपाची चार फूट तीन इंच उभी दगडी मूर्ती तयार केली जात आहे. तीन कारागीर तीन वेगवेगळ्या दगडांमध्ये ते बनवत आहेत. या मूर्ती जवळपास ९० टक्के तयार आहेत.