हैदराबादमध्ये पावसाचा हाहाकार....पूरसदृश्य स्थिती...अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 07:47 PM2017-10-03T19:47:11+5:302017-10-03T20:07:22+5:30

हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

हैदराबाद महानगरपालिकेचे कर्मचारी शहरात जमा झालेले पाणी काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसले.

वादळी पावसामुळे पुढील सरकारी आदेश येईपर्यंत उस्मानिया विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे झालेल्या घराची भिंत पडल्याच्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

नायडू नगर भागातील पावसामुळे एका घराची भिंत कोसळून तिघे ठार झाले. यात एका चार महिन्याच्या चिमुरड्याचा आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे.

तर विजेच्या खांबानजीक असलेल्या वाहनाला स्पर्श केल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला. विजेच्या धक्क्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सांयकाळी ४.३० ते ८.३० च्या सुमारास सुमारे ६७.६ मिमी. इतका विक्रमी पाऊस पडला.

ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू केले असून मदत कार्य करण्यात येत आहे.

हैदराबादमध्ये पावसाचे थैमान सुरू आहे