आधी काश्मीरमध्ये सापडलं लिथियम, आता या राज्यात ९ ठिकाणी सापडलं सोनं, देश होणार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:38 PM2023-02-28T12:38:01+5:302023-02-28T12:41:00+5:30

Gold Reserves Found in Odisha: काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात हजारो कोटी रुपये किमतीचे लिथियमचे साठे सापडले होते. त्यानंतर आता ओदिशामधील तीन जिल्ह्यांमधील ९ ठिकाणी सोन्याचे साठे सापडले आहेत.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात हजारो कोटी रुपये किमतीचे लिथियमचे साठे सापडले होते. त्यानंतर आता ओदिशामधील तीन जिल्ह्यांमधील ९ ठिकाणी सोन्याचे साठे सापडले आहेत.

ओदिशामधील खाण मंत्री प्रफुल्ल मलिक यांनी सांगितले की, भूविज्ञान संचालनालय आणि जीएसआयने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये क्योंझर, मयूरभंज आणि देवगड जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी सोन्याचे साठे असल्याचे समोर आले आहे. त्यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

ढेंकानालचे आमदार सुधीर कुमार सामल यांनी विचारलेल्या एखा लिखित प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितले की, खाणं संचालनालय आणि भारती. भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय)च्या सर्व्हेक्षणामध्ये देवगड क्योंझर आणि मयूरभंजसह तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत.

मलिक यांनी सांगितले की, सोन्याचे साठे क्योंझर जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी आमि मयूरभंज जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी आणि देवगड जिल्ह्यातील एका ठिकाणी सापडले आहेत.

काही दिवसांपूर्वी भारतील भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय)ने जम्मू-काश्मीरमध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि सोलर पॅनल बनवण्यामध्ये महत्त्वपूर्ण धातू असलेल्या लिथियमच्या ५९ लाख टन साठ्यांचा शोध लावला होता.

लिथियम हे दुर्मीळ खनिजांमध्ये समाविष्ट आहे. आधी लिथियम हे भारतात मिळत नव्हते. त्यामुळे भारताला लिथियमची पूर्णपणे आयात करावी लागत होती. आता जीएसआयने जी-३ संशोधनामध्ये वैष्णौदेवी तीर्थक्षेत्राच्याजवळ सलात गावामध्ये सापडलेले लिथियम हे उच्च दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले आहे.