Corona Vaccine: कोरोनाविरुद्ध भारताला मिळालं नवं शस्त्र; ३ डोसवाली पहिलीच लस, विना इंजेक्शन कशी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:31 PM2022-02-03T14:31:50+5:302022-02-03T14:38:17+5:30

Coronavirus: कोविशील्ड, कोव्हॅक्सिननंतर आता भारतीय कंपनीनं बनवलेली लसीचा पुरवठा सुरु. केंद्रानं दिली १ कोटी डोसची ऑर्डर

कोरोनाविरुद्ध भारतासाठी आणखी एक शस्त्र मिळालं आहे. स्वदेशी कंपनी Zydus Cadila ने कोरोना व्हॅक्सिन ZyCov-D चा पुरवठा सुरु केला आहे. ही व्हॅक्सिन १२ वर्ष आणि त्यावरील लोकांना देण्यात येणार आहे. परंतु भारतात सध्या ही व्हॅक्सिन १८ वर्षावरील लोकांना दिली जाईल.

या व्हॅक्सिनचं वैशिष्टं म्हणजे, यात कुठल्याही प्रकारच्या सुईचा वापर करण्यात आला नाही. म्हणजे ही व्हॅक्सिन निडिल फ्री व्हॅक्सिन आहे. विना सुई ही व्हॅक्सिन दिली जाईल. त्याशिवाय ही तीन डोस वाली व्हॅक्सिन असल्याने इतर व्हॅक्सिनपेक्षा वेगळी आहे.

जायडस कॅडिला(Zydus Cadila) ची व्हॅक्सिन जायकोव-डी(ZyCov-D) ला केंद्र सरकारने मागील वर्षी ऑगस्टमध्ये आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. परंतु अद्याप या कोरोना लसीचा वापर करण्यात आला नव्हता.

तीन डोस असणारी लस – आतापर्यंत जगभरात जितक्या लसी देण्यात आल्या त्या एकतर सिंगल किंवा डबल डोस असणाऱ्या आहेत. परंतु जायकोव-डी ही पहिलीच लस आहे जिचे ३ डोस दिले जाणार आहेत.

निडिल फ्री लस – यात कुठल्याही सुईचा वापर करण्यात येणार नाही. जेट इंजेक्टरच्या माध्यमातून ही लस दिली जाईल. या व्हॅक्सिनला हायप्रेशरनं लोकांच्या शरीरावर इंजेक्ट केले जाईल. या डिवाईस अविष्कार १९६० मध्ये झाला होता. WHO ने २०१३ मध्ये याच्या वापराची परवानगी दिली होती.

DNA बेस्ड व्हॅक्सिन – जायकोव-डी जगातील पहिलीच लस आहे जी DNA बेस्ड आहे. आतापर्यंत जितक्या व्हॅक्सिन आहेत त्या mRNA चा वापर केला आहे. परंतु ही लस प्लाज्मिड DNA चा वापर करते.

लसीचा साठा करणं सोप्पं – इतर लसींच्या तुलनेत जायकोव-डीचा साठा करणं सोप्पं आहे. २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानातही ती अधिक काळ टिकते. इतकचं नाही तर २५ डिग्री सेल्सियस तापमानात हिला ४ महिन्यापर्यंत ठेवता येऊ शकते.

या लसीच्या ३ डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर हवे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी आणि तिसरा डोस ५६ दिवसांनी दिला जाईल. ही लस शरीरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी जेनेटिक मटेरियलचा वापर करत असल्याचं सांगितले आहे.

आता उपलब्ध असणाऱ्या लसी mRNA तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्याला मेसेंजर RNA म्हणतात. ही शरीरात जात कोरोनाविरोधात एन्टिबॉडी तयार करतात. तर प्लाज्मिड मानवी शरीरातील पेशींमध्ये असलेल्या DNA मॉलिक्यूल असतं. ही शरीरात गेल्यानंतर वायरल प्रोटिनमध्ये बदललं जातं. त्यामुळे व्हायरलविरोधात इम्यून रिस्पॉन्स निर्माण होतात.

या लसीत आणखी एक विशेष म्हणजे जर काही अपडेट करायचे असतील तर त्यासाठी एका आठवड्याचा कालावधीही पुरेसा असतो. जर व्हायरस म्यूटेट होत असेल तर काही दिवसांत लसीत बदल करु शकतो. DNA व्हॅक्सिन जास्त प्रभावी आणि मजबूत आहे.

केंद्र सरकारने या लसीचे १ कोटी डोस ऑर्डर केले होते. त्याचा पुरवठा कंपनीने आता सुरु केला आहे. ही व्हॅक्सिन आता सरकारकडून मोफत दिली जाणार आहे. कंपनीनं या लसीच्या एका डोसची किंमत २६५ रुपये ठेवली आहे. त्याशिवाय एका डोसवर ९३ रुपये जीएसटी लागेल. म्हणजे एका डोसची किंमत ३५८ रुपये इतकी असेल.