Corona Virus : 22% लोकांना कोरोनाची अनेकवेळा लागण; 20% लोकांची प्रकृती चिंताजनक, धक्कादायक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 03:58 PM2023-09-01T15:58:05+5:302023-09-01T16:20:26+5:30

Corona Virus : कोरोना महामारीचा धोका अद्याप टळलेला नाही. भारताबद्दल बोलायचं झालं तर लोक सतत व्हायरसच्या विळख्यात येत आहेत.

कोरोना महामारीचा धोका अद्याप टळलेला नाही. भारताबद्दल बोलायचं झालं तर लोक सतत व्हायरसच्या विळख्यात येत आहेत. याच दरम्यान, 'लोकल सर्किल'च्या सर्वेक्षणात कोविड संसर्गाबाबत धक्कादायक खुलासे झाले आहेत.

या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 63% भारतीयांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. त्याच वेळी, 22% लोकांना वारंवार कोरोनाची लागण होत आहे. तर 20% लोकांची तब्येत जास्त बिघडल्याने परिस्थिती गंभीर बनली होती.

2022 मध्ये कोविड संसर्ग झाल्याची पुष्टी झालेल्या लोकांपैकी 93% लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. सर्वेक्षणाचे निष्कर्ष सूचित करतात की, अधिकृत डेटा प्रकरणांची कमी नोंदवत आहे कारण बरेच लोक लक्षणे असूनही RT-PCR चाचण्या टाळतात.

जेव्हा कोरोनाचा धोका टळला नाही, तेव्हा 25% लोकांना मास्क लावणे आवश्यक आहे आणि वारंवार संसर्ग टाळण्यासाठी आणि संसर्ग झाल्यानंतर गंभीर आजारी पडू नये म्हणून सोशल डिस्टेंसिंगसारखे प्रोटोकॉल पाळणे आवश्यक आहे.

जागतिक स्तरावर, नवीन कोरोनाता व्हेरिएंट BA.2.86 ओळखला गेला आहे. ज्याचं नाव पिरोला असं आहे. नवीन व्हेरिएंट अमेरिका (यूएसए), ब्रिटन आणि चीनसह अनेक देशांमध्ये पसरला आहे. त्यामुळे अधिक लोकांना संसर्ग होत आहे.

नवीन व्हेरिएंट या गोष्टीची आठवण करून देतं की जेव्हा आपल्या सभोवतालचे लोक आजारी असतात तेव्हा आपण ताबडतोब पूर्वीच्या सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सुरुवात केली पाहिजे.

तुम्हाला एकदा कोरोना झाल्याची पुष्टी झाली असेल किंवा अनेक वेळा संसर्ग झाला असेल आणि बरा झाला असेल, तरीही आणखी संसर्ग होण्याचा धोका आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सर्वेक्षणात सहभागी झालेले बहुतेक संक्रमित लोक कोरोनामधून बरे झाले असूनही, अजूनही असे बरेच लोक आहेत जे पूर्णपणे निरोगी नाहीत म्हणजे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाहीत किंवा त्यांच्यामध्ये नवीन आरोग्य समस्या विकसित झाल्या आहेत.

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना संसर्गानंतर अनेकांना शरीराच्या विविध अवयवांवर दीर्घकालीन परिणाम जाणवले. असे लोक रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर), स्लीप एपनिया, लिव्हर सिरोसिस यासारख्या नवीन आरोग्य धोक्यांना बळी पडले.

मोठ्या प्रमाणावर आपल्याला यापुढे कोरोना संसर्गाची किंवा वारंवार होणार्‍या संसर्गाची भीती वाटत नसली तरी, काही इम्युनोलॉजिस्ट हा प्रश्न उपस्थित करत आहेत की वारंवार कोरोनामुळे आपल्या टी-सेल्स नष्ट होऊ शकतात का आणि त्यामुळे इतर विषाणूजन्य आजारांशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती तर कमी होणार नाही? एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.