प्रकाशाने न्हाऊन निघालेला कॉरिडॉर, स्वागताला सज्ज जटायू, रात्रीच्या अंधारात चमकणारे राम मंदिर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:45 PM2024-01-08T13:45:06+5:302024-01-08T16:49:49+5:30

अयोध्येतील राम मंदिराचे काम जोरदार सुरू आहे. २२ जानेवारी या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सिंह द्वार असे नाव देण्यात आले आहे. या गेटवर गरूण मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. याचे फोटो आता समोर आले आहेत.

मंदिराच्या छताला कोरीव काम करण्यात आले आहे.

राम मंदिराचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. राम मंदिराबाहेरही पाण्यासारखे देखावे करण्यात आले आहेत.

राम मंदिराच्या तळमजल्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तळमजल्यावरील कॉरिडॉरमध्ये प्रकाशाची व्यवस्था आहे.

श्री रामजन्मभूमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गजा, सिंह, हनुमानजी आणि गरुडजींच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. राजस्थानातील बन्सी पहारपूर या गावातील हलक्या गुलाबी रंगाच्या वाळूच्या दगडापासून या मूर्ती बनवल्या आहेत.

राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रितिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची आता जोरदार तयारी सुरू आहे. पीएम नरेंद्र मोदी यांच्याहस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

देशभरातील व्हीआयपींना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. २२ जानेवारीला देशभरात हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांनी अयोध्येतील विमानतळाचे उद्घाटन केले आहे. देशभरातून राम भक्तांना विमान, रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

१४ जानेवारीपासून अयोध्येत रामोत्सव साजरा केला जाणार आहे. हा रामोत्सव आठ दिवस चालणार आहे. उत्तर प्रदेश राज्यातील सर्व जिल्हे, गावे आणि शहरी भागात हा रामोत्सव साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.