PHOTOS : फॉर्च्युनरपेक्षाही जास्त 'भाव' अन् राजेशाही 'थाट', 'राघव' बैलाची बातच न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 09:19 PM2023-09-06T21:19:39+5:302023-09-06T21:22:35+5:30

गुजरातमधील अमरेली येथे एक मोठी गोशाळा आहे, जिथे गायी, म्हशी, बैल यांची काळजी घेतली जाते.

गुजरातमधील अमरेली येथे एक मोठी गोशाळा आहे, जिथे गायी, म्हशी, बैल यांची काळजी घेतली जाते. येथील काही बैलांची किंमत लाखोच्या घरात आहे.

या गोठ्यातील राघव या बैलाची किंमत 'फॉर्च्युनर' कारपेक्षा जास्त आहे.

अमरेली जिल्ह्यातील शेतकरी शेतीसोबतच पशुपालन देखील करतात, त्यातून त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. गीर जातीच्या गायी आणि बैलांची इथे काळजी घेतली जाते. येथील गाई, म्हशी आणि बैलांची किंमत लाखोंमध्ये होते.

सावरकुंडला तालुक्यातील अमृतवेल गावात खोडियार मंदिरात ही गोशाळा आहे. इथे 'राघव' नावाचा बैल आहे, ज्याची किंमत ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. त्याचा राजेशाही थाट सर्वांचे लक्ष वेधतो.

या गोशाळेत 'लाडली' नावाचे एक वासरू देखील आहे. लक्षणीय बाब म्हणजे ते चार वर्षांचे असताना त्याला ११ लाखाची बोली लागली होती.

या गोशाळेत गिर गाय आणि चांगल्या जातीची वासरे तयार केली जातात.

लाडली या वासराच्या आईला ८.६० लाख रूपयांमध्ये जवळच्या शेतकऱ्याने खरेदी केले. तर, राघव या बैलाची किंमत ४५ लाख रूपये एवढी आहे.

सर्वांच्या लाडक्या वासराचे वय ११ महिने आहे. गोशाळेतून वासरे किंवा इतर जनावरांची विक्री केली जात नाही. मात्र, येथे चांगल्या जातीच्या गायी निर्माण होतात.

टॅग्स :गुजरातGujarat