10,001 लोकांनी एकत्र येऊन सादर केलं नृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 09:53 PM2017-08-18T21:53:43+5:302017-08-18T22:28:27+5:30

इंडोनेशियामध्ये गेल्या रविवारी (दि.13) जवळपास दहा हजार लोकांनी एकत्र येऊन नृत्य सादर केले.

इंडोनेशियातील अशेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

येथील सर्वाधिक लोकप्रिय असलेले 'समन' हे पारंपरिक नृत्य यावेळी सादर करण्यात आले.

दहा हजार लोक एकत्र येऊन नृत्य करणे, हा आतापर्यंत जगातभरात झालेला एकमेक कार्यक्रम असल्याचे बोलले जात आहे.

याआधी 2014 मध्ये 5,057 एकत्र येऊन नृत्य सादर केले होते.

'समन' या पारंपरिक नृत्याला 2011 मध्ये युनोस्कोने सांस्कृतिक हेरिटेजचा दर्जा दिला आहे.