देशसेवेसाठी 'महा'राष्ट्र, 3 वर्षात 11 हजार मराठी मुलं सैन्यात भरती 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 01:22 PM2020-03-12T13:22:29+5:302020-03-12T13:40:35+5:30

maharashtra youth join indian amry mostly, raral area of maharashtra youth join amry. 11 thousand young join in last 3 year

महाराष्ट्र हा सर्वच क्षेत्रात देशविकासासाठी योगदान देत असतो. तोच महाराष्ट्र सीमारेषेवरही छाती ठोकून पुढे असतो. गेल्या तीन वर्षात देशभरातील 1 लाख 54 हजार 902 तरूण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत

महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा यात समावेश आहे. यावरुन महाराष्ट्राचं देशाच्या संरक्षण क्षेत्रातही मोठं योगदान असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सैन्यात भरती झाला आहे.

नुकतेच देशाच्या लष्करप्रमुख पदी मराठी माणूस असलेले महाराष्ट्रपुत्र मनोज निरवणे यांची नियुक्ती झाली आहे

त्यामुळे, सैन्यदलात जवानांपासून ते लष्करप्रमुखांपर्यंत महाराष्ट्राचे योगदान भारतीय सैन्य दलात असल्याचे दिसून येते.  

देशातील तरूण मोठ्या प्रमाणात भारतीय सेनेत दाखल झाल्याचे चित्र आहे. भारतीय सेनेत गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध रिक्त पदांच्या सैन्य भरतीमध्ये 30 राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील तसेच नेपाळमधील सरासरी 95 टक्के  तरूण दाखल झाले आहेत.

. यात एकट्या महाराष्ट्रातील 11 हजार 866 तरुणांचा समावेश आहे.

वर्ष 2016-17 मध्ये महाराष्ट्रातील 3 हजार 980 तरूण , वर्ष 2017-18 मध्ये  3 हजार 836 आणि

वर्ष 2018-19 मध्ये 4 हजार 50 तरुण भारतीय सैन्यात दाखल झाले आहेत.

भारतीय सैन्यात वर्ष 2016-17 मध्ये 52 हजार 86 तरूण दाखल झाले, वर्ष 2017-18 मध्ये 49 हजार 438 तर वर्ष 2018-19 मध्ये 53 हजार 378 दाखल झाले आहेत

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

कोल्हापूर अन् सांगलीतील पुरावेळी या जवानांनी जीवाची बाजी लावून पुरात अडकलेल्या लोकांची जीव वाचवला