Maharashtra Politics: महाराष्ट्रात आताच लोकसभा निवडणूक लागली तर? शिंदे-भाजपा किती जागा जिंकणार, धक्कादायक सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 01:12 PM2023-01-28T13:12:25+5:302023-01-28T13:18:56+5:30

Loksabha Election Survey: अद्याप त्यासाठी सव्वा ते दीड वर्ष असले तरी आजचे राजकीय वातावरण काय, महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे? कोणाला जास्त जागा मिळतील? एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे.

तसे पहायचे झाले तर देशात २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. परंतू, सध्या त्याचे वातारवण तयार करण्याची कामे सुरु झाली आहे. सत्ताधारी पक्ष विकासकामांचे उद्धाटन, पायाभरणी करत आहेत.

विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहेत. अद्याप त्यासाठी सव्वा ते दीड वर्ष असले तरी आजचे राजकीय वातावरण काय, महाराष्ट्रात परिस्थिती काय आहे? कोणाला जास्त जागा मिळतील? एक धक्कादायक सर्व्हे समोर आला आहे.

गेल्या वर्षी भाजपाने राज्यात मिशन ४५ सुरु केले होते. यानंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केले आणि वेगळी चूल मांडली. सध्या शिंदे सरकारच्या अस्तित्वाची लढाई कोर्टात आणि निवडणूक आयोगात सुरु आहे. कोणाच्या बाजुने निकाल लागेल आणि कधी लागेल हे काहीच सांगता येत नाहीय. तोवर लोकसभा आणि विधानसभा येऊन ठेपण्याची शक्यता आहे.

राज्यात २०१९ च्या लोकसभेचा निकाल पाहिला तर भाजपाला २३ जागा मिळाल्या होत्या. भाजपाचा मताचा टक्का 27.59 एवढा होता. तर काँग्रेसला एक, राष्ट्रवादीला ४, एमआयएमला १ आणि शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे बहुतांश खासदार आता शिंदे गटात आहेत.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सध्या वंचित बहुजन आघाडीसोबत घरोबा केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत थोडी धुसफुस आहे. याकडे काहीसे दुर्लक्ष केले आणि ठाकरे सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस जर एकत्र लोकसभेला लढली तर भाजपाला जबर धक्का बसणार आहे.

आतच निवडणुका झाल्या तर, इंडिया टुडे-सी-व्होटरने एक सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार आता लोकसभा निवडणूक झाल्यास यूपीएला (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी) 34 जागा मिळू शकतात. म्हणजेच एकूण मतदानाच्या 48 टक्के वाटा यूपीएच्या खात्यात जाऊ शकतो. आता निवडणुका लागल्यास उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीसोबत काँग्रेस चमत्कार करू शकतात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सध्याचे राजकीय वातावरण पाहता हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार अल्पमतात गेले होते आणि फ्लोअर टेस्टपूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर तिन्ही पक्ष जर एकत्र लढले त्याविरोधात भाजपा आणि शिंदे गट लढला तर लोकांच्या मनात काय आहे हे या सर्व्हेतून समोर आले आहे.

महाराष्ट्रात शिंदे- भाजपा ही नवी राजकीय आघाडी तयार झाली असून, त्याची पहिली कसोटी आगामी मुंबई महापालिका निवडणूक मानली जात आहे. मुंबई महापालिका गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात होती. सध्या त्यावर प्रशासकीय अंमल आहे. म्हणजेच शिंदे सरकारचा. ही पालिका शिंदे-भाजपाला आपल्या ताब्यात घ्यायची आहे. यासाठी मोदी नुकतेच मुंबईते येऊन गेले आहेत.