जगातील सर्वात महागडा बटाटा, ५० हजार रुपये किलोपर्यंत आहे किंमत! पाहा कुठे होते शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 04:24 PM2022-12-02T16:24:24+5:302022-12-02T16:27:55+5:30

La Bonnotte ची गणना जगातील सर्वात महागड्या बटाट्याच्या व्हरायटीमध्ये होते.

बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. यापासून अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ प्रत्येकाच्या घरात बनवले जातात. बाजारात गेल्यावर बटाट्याचे भाव ३० ते ७० रुपये किलोपर्यंत राहतात.

अशा परिस्थितीत एक किलो बटाट्याची किंमत 40 ते 50 हजार रुपये सांगितली तर तुम्हाला धक्काच बसेल. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. जगात अशा प्रकारच्या बटाट्याची लागवड केली जाते, ज्याची एक किलोची किंमत सुमारे 50 हजार आहे.

La Bonnotte नावाच्या या बटाट्याची लागवड फ्रेंच बेट Ile de Noirmoutier येथे केली जाते. त्याची लागवड रेती असलेल्या जमिनीवर केली जाते. समुद्री शेवाळ खत म्हणून काम करतात. केवळ 50 चौरस मीटर जमिनीवरच त्याची लागवड केली जाते, असे सांगितले जाते.

potatoreview वेबसाइटनुसार, त्याची सरासरी किंमत प्रति किलोग्राम आहे 500 युरो म्हणजे सुमारे 44282 रुपये प्रति किलो. याच्या किंमतीत चढ उतार पाहायला मिळतो. जागतिक मीडिया कंपनी Conde Nast Travel ने जगातील पाच सर्वात महाग भाज्यांमध्ये याचा समावेश केला आहे.

हा बटाटा दुर्मिळ प्रजातीच्या श्रेणीत ठेवण्यात आला आहे. La Bonnotte दरवर्षी फक्त 10 दिवसांसाठी आढळतो. त्याच्या लागवडीसाठी खूप काळजी घ्यावी लागते. या बटाट्याची लागवड केल्यानंतर तीन महिन्यांनी खोदून तो काढला जातो. फेब्रुवारीमध्ये पेरणी केली जाते आणि मेमध्ये तो काढला जातो. हा बटाटा जमिनीवरून काढण्यासाठी हलक्या हाताने काम करावे लागते. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

या बटाट्याची चव थोडी खारट असते. हे प्युरी, सॅलड, सूप आणि क्रीम तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तसेच याचे सेवन अनेक आजारांवर फायदेशीर मानले जाते.

ट्रेड इंडिया या ई-कॉमर्स वेबसाइटवर एक किलो La Bonnotte ची किंमत 690 USD म्हणजेच 56,020 रुपये किलो आहे. त्याच वेळी, Go for World Business वर 500 ग्रॅम बटाट्याची किंमत 300 USD म्हणजेच 24 हजार रुपये आहे.