PHOTOS: एकाच कॉलनीत राहतात जगभरातील अब्जाधीश लोक, बंगल्याची किंमत वाचून येईल चक्कर....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 03:18 PM2023-02-14T15:18:08+5:302023-02-14T15:24:52+5:30

Palm Jumeirah Most Expensive Property in Dubai : इथे राहणारा प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या देशातील श्रीमंतापैकी एक आहे. पाम जुमेराहमध्ये एका बंगल्याची किंमत कोट्यावधी रूपये आहे.

Palm Jumeirah Most Expensive Property in Dubai : देशात असे अनेक महानगरांमध्ये असे अनेक परिसर आहेत जिथे श्रीमंत आणि शक्तीशाली लोक राहतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, एका देशात एक असं आयलॅंड आहे जिथे जगभरात अब्जाधीश लोक राहतात. इथे राहणारा प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या देशातील श्रीमंतापैकी एक आहे. पाम जुमेराहमध्ये एका बंगल्याची किंमत कोट्यावधी रूपये आहे. आणि घराची सुंदरात त्यापेक्षा जास्त आहे.

दुबईमधील पाम जुमेराह हे असं ठिकाण आहे जिथे जगभरातील उद्योगपती, खेळाडू, कलाकारांनी आपल्यासाठी बंगला खरेदी केला आहे. इथे एका एका बंगल्याची किंमत कोट्यावधी आणि अब्जो रूपये आहे.

ताडाच्या झाडाच्या आकारात बनवलेलं हे आयलॅंड आपल्या सुंदरतेसाठी आणि सुविधांसाठी फेमस आहे. ताडाच्या झाडाचा आकार असल्याने या आयलॅंडला पाम जुमेराह असं म्हटलं जातं. 2001 मध्ये याचं निर्माण सुरू झालं होतं त्यानंतर 2007 मध्ये लोक इथे राहू लागले होते.

पाम जुमेराह हे एक मानव निर्मित बेट आहे. जे 560 हेक्टरमध्ये पसरलं आहे. याची खासियतमध्ये समुद्रात तयार केलेलं हे बेट तयार करण्यासाठी स्टील किंवा कॉंक्रीटचा वापर करण्यात आलेला नाही. हे बेट वाळूपासून तयार करण्यात आलं आहे. यासाठी 70 लाख टनपेक्षा जास्त डोंगर फोडून इथे मलबा भरण्यात आला आहे.

समुद्राच्या निळ्या चमकत्या पाण्याच्या मधोमध वसलेलं हे पाम जुमेराह जगभरात एक फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. जिथे लक्झरी हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, स्पा, शानदार क्लब आणि अपार्टमेंट्स आहेत.

पाम जुमेराहमध्ये जगभरातील अनेक अब्जाधीशांनी आपल्यासाठी घर खरेदी केलं आहे. ज्यात अनेक मोठ्या लोकांची नावं आहेत. यात शाहरूख खान याचाही समावेश आहे. अनेक हॉलिवूड कलाकारांनीही इथे बंगले घेतले आहेत.

नाइट फ्रैंक द्वारे प्रकाशित एका रिपोर्टनुसार, 'दुबई रेजिडेंशियल मार्केट रिव्ह्यू विंटर 2022-23' मधून समजतं की, इथे घर खरेदी करण्याची किंमत $ 870 प्रति स्क्वेयर फूट आहे. समजा एखाद्या अब्जाधीशाने इथे 5 हजार स्क्वेयर फूटाचा बंदला खरेदी केला तर तो 35 कोटी 67 लाख रूपयांचा होईल.