गुन्हे विश्वातील सगळ्यात सेक्सी क्रिमिनल, आपल्या सौंदर्याच्या मदतीने वाढवलं होतं साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 09:25 AM2023-03-20T09:25:57+5:302023-03-20T09:33:40+5:30

Angie Sanclemente : एंजी सांक्लेमेट वालंसिया हिला गुन्हेगारी विश्वातील राणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोलंबियाच्या या ब्युटी क्वीनने आपल्या करिअरच्या सुरूवातीला मॉडलिंगचं काम केलं.

Hottest Female Criminal : क्राइमच्या विश्वाचं खतरनाक रूप अनेक सिनेमातून तुम्ही पाहिलं असेल. हे विश्व आणखी खतरनाक तेव्हा होतं जेव्हा यासोबत सुंदर महिला जुळतात. आज आम्ही अशाच एका लेडी डॉनबाबत आम्ही सांगणार आहोत जिच्या सुंदरतेला पाहून भले भले गार झाला होते. या महिलेला सगळ्यात सेक्सी क्रिमिनल म्हटलं जातं.

एंजी सांक्लेमेट वालंसिया हिला गुन्हेगारी विश्वातील राणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोलंबियाच्या या ब्युटी क्वीनने आपल्या करिअरच्या सुरूवातीला मॉडलिंगचं काम केलं. 2000 साली एंजीने कोलंबिया कॉफी क्वीन ब्युटी कन्टेस्ट आपल्या नावावर केला होता.

एंजीचं सौंदर्य पाहून कुणीही तिच्यावर फिदा होत होते. कोलंबियाची ही ब्युटी क्वीन तिच्या काळात टॉक ऑफ द टाऊन राहिली, पण नंतर तिच्याकडून हे टायटल काढून घेण्यात आलं होतं, कारण त्यासाठी अविवाहित असणं गरजेचं होतं. पण एंजीने केलं होतं. एक वेळ अशीही आली होती की, ती अचानक गायब झाली.

2005 मध्ये पुन्हा एकदा तिच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी प्रकाशित वृत्तांनुसार, एंजी मेक्सिकोमध्ये राहत होती, येथील एका ड्रग डीलरसोबत ती रिलेशनशिपमध्ये आली होती. या ड्रग डीलरला मेक्सिकोमध्ये 'द मॉन्स्टर' नावाने ओळखलं जात होतं. या दोघांच्या नात्याचे किस्से खूप दिवस गाजले आणि दोघे बरीच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

जशी एंजी या रिलेशनशिपमधून बाहेर पडली, तिने गुन्हे विश्वाला आपल्या सुंदरतेचा तडका लावला. सुंदरता आणि गुन्हे हे कॉकटेल चांगलंच गाजलं. आपल्या एक्सचा सूड बॉयफ्रेंड घेण्यासाठी मॉडलने आपलं स्वत:चं ड्रग्सचं रॅकेट सुरू केलं. सुपरमॉडलच्या सुंदरतेने हे ड्रग्स रॅकेट वाढवण्यास फार मदत केली. दसऱ्या देशांमध्ये राहणाऱ्या सुंदर तरूणी एंजीच्या पावला पाउल देत ड्रग्स रॅकेटसोबत जुळत होत्या.

एंजीचं डोकं आणि सौंदर्याने तिला गुन्हे विश्वात पुढे जाण्यास मदत झाली. पण 2009 मध्ये तिचे वाईट दिवस सुरू झाले. तिची गॅंग कोलंबिया, अर्जेन्टिना आणि यूरोपमध्ये खूप वाढू लागली होती. पण 2009 मध्ये या गॅंगची एक मॉडल 55 किलो ड्रग्ससोबत पकडली गेली. 2010 मध्ये अर्जेंटीना पोलिसांनी एंजीला सुद्धा अटक केली.