'या' आहेत लिलावात सर्वात महागड्या विकल्या गेलेल्या बंदुकी, कोट्यावधी आहे काहींची किंमत....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 04:53 PM2021-06-01T16:53:50+5:302021-06-01T17:06:00+5:30

तशा तर टेक्नॉलॉजीच्या बदलानुसार आज बाजारात अनेक घातक बंदुकी मिळतात. पण आज आम्ही काही ऐतिहासिक बंदुकींबाबत सांगणार आहोत. ज्यांची किंमत कोट्यवधी रूपये आहे.

पिस्तुलांबाबत नेहमीच लोकांना आकर्षण असतं. काही लोक आवड म्हणून तर काही लोक सुरक्षेच्या कारणांसाठी जवळ पिस्तुल ठेवतात. तशा तर टेक्नॉलॉजीच्या बदलानुसार आज बाजारात अनेक घातक बंदुकी मिळतात. पण आज आम्ही काही ऐतिहासिक बंदुकींबाबत सांगणार आहोत. ज्यांची किंमत कोट्यवधी रूपये आहे.

हिटलरची गोल्डन गन - या बंदुकीला "फ्यूहरर ची गोल्डन गन" म्हणूनही ओळखलं जातं. अफवा आहे की, ही बंदुक अॅडॉल्फ हिटलरला १९३९ मध्ये वाल्थर परिवाराने गिफ्ट म्हणून दिली होती. ही एक सोन्याची ७.६५ मिमी वाल्थर पीपी आहे. १९८७ मध्ये ही बंदुक एका अज्ञात व्यक्तीला ८२, ९५, ४९५ रूपयांना विकण्यात आली होती.

Wyatt Earp ची कोल्ट .45 रिवॉल्वर - वायट अर्प अमेरिकन ओल्ड वेस्टमधील एक प्रसिद्ध नाव होतं. तो १८८० मध्ये टॉम्बस्टोन, एरिझोना शहरात एक मार्शल होता. त्याने अनेक धद्यांमध्ये हात आजमावला होता. असे सांगितले जाते की, या बंदुकीचा वापर त्याने कुख्यात ओके कोरल शूटआउटमध्ये केला होता. ही बंदूक लिलावात १,६३,७२,६८७ रूपयांना विकली गेली होती.

स्मिथ अॅड वेसन .44 कॅलिबर - या बंदुकीने Jesse James ला मारण्यात आलं होतं. जेम्स अमेरिकी वेस्टचा कुख्यात डाकू होता. ज्याने १८८० मध्ये आपल्या टोळीसोबत स्टेजकोच, बॅंक आणि रेल्वेंची लूट केली होती. तो कधीही पकडला जात नव्हता. नंतर या बंदुकीने त्याला गोळी मारण्यात आली. ही बंदूक लिलावात २,३६,४९,४३७ रूपयांना विकली गेली होती.

टेडी रूज़वेल्टची शॉटगन - टेडी रूझवेल्ट हे अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना शिकारीची फार आवड होती. त्यांच्याकडे डबल बॅरल शॉटगन होती. १९०९ मध्ये स्मिथसोनियन आफ्रिकन अभियानाच्या सुरूवातीला त्यांनी गन आपल्या सोबत नेली होती. या बंदुकीला लिलावात ६,२७,२५,५८५ रूपये किंमत मिळाली होती.

टेक्सास रेंजर सॅम विल्सनचा कोल्ट वॉकर - ही रिवॉल्वर खासकरून कुलीन टास्क फोर्सच्या वापरासाठी तयार करण्यात आली होती. १८४७ मद्ये टेक्सास रेंजर सॅम विल्सनला ही रिवॉल्वर देण्यात आली. ही एक ब्लॅक पावडर रिवॉल्वर आहे जे २२० ग्रेन बुलेट किंवा कॅलिबर राउंड बॉल शूट करण्यात सक्षम होती. या रिवॉल्वरला लिलावात ६,६९,४६,१०० रूपये किंमत मिळाली होती.

कोल्ट पॅटर्सन रिवॉल्वर - कोल्ट पॅटर्सन रिवॉल्वरला लिलावात ७,११,३०, २३१ रूपये किंमत मिळाली होती. ही पहिली पिस्तुल होती जिला चालवताना रिपीट केलं जाऊ शकत होतं. सॅम्युअल कोल्टने १८३८ मध्ये याचं पेटेंट केलं होतं. ही एक फार दुर्मीळ पिस्तुल आहे.

गोल्ड-इनलाइड कोल्ट मॉडल १८४९ पॉकेट रिवॉल्वर - पॉकेट रिवॉल्वरचं १८४९ मॉडल ऐतिहासिक आहे. कारण ही रिवॉल्वर डिझाइन आणि उद्योगाला दर्शवते. ही एक छोटी गन होती आणि सहजपणे कुठेही नेता येत होती. ही गन ८ कोटी रूपयांना विकली गेली होती. यावर सोन्याने काम केलं गेलं होतं.

सिमोन बोलिवरची फ्लिंटलॉक पिस्तुल - ही जगातली तिसरी सर्वात महागडी किंमत मिळणारी गन आहे. ही गन सिमोन बोलिवरची होती. त्यांनी अनेक स्वातंत्र लढ्यात भाग घेतला होता. या ऐतिहासिक गनला लिलावात १२,२७,९५,१५६ रूपये इतकी किंमत मिळाली होती.

जॉर्ज वाशिंग्टनची सॅडल पिस्टल - अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिग्टन यांच्या बंदुकीचा सेट लिलावात दुसरा सर्वात जास्त किंमत मिळणारा सेट आहे. ही पिस्तुल क्रांतिकारी युद्धातील आहे. अमेरिका स्वातंत्र्यासाठी लढत होता. २००२मध्ये रिचर्ड किंग मेलॉन फाउंडेशनने ही गन १४, ४५,१६, २५५ कोटी रूपयांना खरेदी केली होती.

बंदुकीने राष्ट्राध्यक्ष लिंकन यांची हत्या झाली होती - ही बंदूक फार किंमती आहे. त्यामुळे या बंदुकीचा लिलाव केला जाऊ शकत नाही. या ६ इंचाच्या डेरिंगरला जॉन विल्क्स बूथने राष्ट्राध्यक्ष लिंकन यांची हत्या करण्यासाठी डिझाइन केलं होतं. या बंदुकीचा १८०० मध्यात १८१९ मध्ये लिलाव करण्यात आला होता. पण या बंदुकीचा आता लिलाव केला जाणार नाही.