Most Expensive Countries: आशियातील सर्वात महागडे देश; जिथे दूध आणि ब्रेड खरेदी करण्यापूर्वीच शंभरवेळा करावा लागेल विचार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:33 AM2023-03-16T10:33:57+5:302023-03-16T10:54:56+5:30

Most Expensive Countries in Asia : भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे, ज्याची लोकसंख्या 450 कोटींहून अधिक आहे.

अमेरिका (US) आणि पाश्चात्य देशांच्या दृष्टिकोनातून, आशिया (Asia) खंड फार महाग असल्याचे म्हटले जात नाही. कारण या खंडाला विकसनशील अर्थव्यवस्थांचे माहेरघर म्हटले जाते. आशियाबद्दल असे म्हटले जाते की, येथे राहण्याची आणि खाण्याची किंमत (Living Cost) जास्त नाही, हा विचार योग्य नाही. भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या बाबतीत आशिया हा जगातील सर्वात मोठा खंड आहे, ज्याची लोकसंख्या 450 कोटींहून अधिक आहे.

जगातील काही आश्वासक अर्थव्यवस्था (Economy) सध्या आशियामध्ये आहेत. मात्र, आशियातील बहुतेक देशांसाठी 2022 हे वर्ष चांगले राहिले नाही, कारण येथे विक्रमी महागाई (Inflation) वाढली आहे. दरम्यान, काही लोकांना वाटते की, भारतात इतकी गर्दी आहे, कुठंतरी दुसरीकडे कुठेतरी स्थायिक व्हावे. असा विचार करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे की, परदेशात राहणे सोपे नाही. कुठेही स्थायिक होण्याचा विचार करण्याआधी तिथल्या पीठ आणि डाळीची किंमत जाणून घेतली पाहिजे. अशा परिस्थितीत आशियातील सर्वात महागड्या देशांबद्दल माहिती जाणून घ्या...

आशियातील सर्वात महागड्या देशांमध्ये सर्वात पहिले नाव जपानचे आहे. जपान इतके महाग असण्याचे एक कारण म्हणजे देशवासीयांना चांगल्या दर्जाचे जीवनमान देणे. विशेष म्हणजे विकसित देश विकसनशील देशापेक्षा महाग असतो आणि जपान हा केवळ आशियातीलच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात विकसित देशांपैकी एक आहे.

'याहू डॉट कॉम'मध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार जपाननंतर कोरियन द्वीपकल्पात प्रचंड महागाई आहे. येथे राहणे देखील खूप महाग आहे. या देशातील भाडे सहसा खूप जास्त असते. यामुळेच सोयोलसह येथील अनेक शहरे त्यांच्या राहणीमानानुसार लोकांच्या बजेटच्या बाहेर आहेत.

झिरो-कोविड धोरणामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला गेल्या काही वर्षांत फटका बसला आहे. त्यामुळे चीनमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. संरक्षण बजेटमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सरकारचे इतर क्षेत्रांवर लक्ष कमी दिसते. यामुळे आशिया खंडातील महागड्या देशांत चीनचीही गणना होते.

सिंगापूर हे जगाचे आर्थिक केंद्र मानले जाते आणि बहुतेकदा जगातील सर्वात महागड्या शहरांमध्ये स्थान दिले जाते. सध्या कमी पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने येथील दर सरासरीपेक्षा जास्त झाले आहेत. सिंगापूरमध्ये सतत वाढत जाणारे भाडे (रेंट) इतके महाग आहे की, तुम्ही सिंगापूरमध्ये स्थायिक होण्याची कल्पनाही करू शकत नाही. वाढती लोकसंख्या आणि जमिनीची उपलब्धता नसल्याने येथील निवासी व व्यावसायिक मालमत्तांच्या भाड्यात ऐतिहासिक वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, येथे देखील तुम्हाला दूध आणि ब्रेडचे पॅकेट खरेदी करण्यापूर्वी 10 वेळा बजेटची काळजी घ्यावी लागेल.

आशियातील महागड्या देशांच्या यादीत फिलीपिन्सचे नावही समाविष्ट आहे. 113 मिलियनहून अधिक लोकसंख्या असूनही, देश आयातदारांसाठी एक छोटी बाजारपेठ आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे येथील अर्थव्यवस्था कमकुवत असून राहणीमानाचा खर्चही झपाट्याने वाढला आहे.