जगातलं सर्वात मोठ्ठ कब्रस्तान, बघितल्यावर वाटतं जसं एखादं शहर, पण येथे दफन आहेत ५० लाख मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:25 PM2021-08-04T17:25:36+5:302021-08-04T17:51:25+5:30

जगात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या पाहिल्यावर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. हे फोटो पाहिल्यावर तुम्हाला वाटेल हे कोणततरी शहर आहे. पण हे जगातलं सर्वात मोठ कब्रस्तान आहे.

या फोटोत दिसणारं हे ठिकाण कोणतं शहर नसून दफनभूमी आहे. या दफनभूमीचं नाव आहे, वादी-ए-सलाम (Wadi al-Salam cemetery)

वादी-ए-सलाम (Wadi al-Salam cemetery) ही जगातील सर्वात मोठी दफनभूमी आहे.

इराकच्या नजफ या ठिकाणी असलेल्या वादी-ए-सलाम दफनभूमीला शांततेचं खोरं असंही म्हटलं जातं.

ही दफन भूमी शिया समुहाचं पवित्र शहर असलेल्या नजफमध्ये आहे.

वादी-ए-सलाम दफनभूमी 1,485.5 एकर म्हणजेच 6 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेली आहे.

या ठिकाणी 50 लाख पेक्षा अधिक लोकांना दफन करण्यात आलंय. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तर इथं यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मृतदेह आहेत.

नजफमधील ही दफनभूमी इमाम अली इब्न अबी तालिब (Imam Ali ibn Abi Talib) चौथे सुन्नी खलिफा आणि पहिले शिया इमाम यांच्या दरगाहजवळ आहे.

जगभरातील शिया लोकांचा स्वतःला मृत्यूनंतर वादी-ए-सलाममध्ये दफन व्हावं अशी इच्छा असते.

या दफनभूमीत तळघरांमध्ये मृतदेह ठेवले जातात. प्रत्येक तळघरात 50 मृतदेह या प्रमाणे ही व्यवस्था असते. यामुळे तिथं स्वच्छता ठेवता येते.

मागील 1400 पेक्षा अधिक वर्षांमध्ये इथं लाखो जणांना दफन करण्यात आलेय. त्यामुळे त्यांची मोजदादच नाही.

Read in English