बाबो! 'या' भिकाऱ्यांना मिळतो वीक-ऑफ; दिवसानुसार बदलतात देवाचा फोटो, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:41 PM2020-03-02T12:41:19+5:302020-03-02T12:51:41+5:30

आपण अनेकदा रस्त्यावर येता-जाता वाटेत भीक मागणारे अनेक भिकारी पाहिले असतील, कधी कोणी देवाचा फोटो लावून भीक मागतो तर कधी आपली कला सादर करुन भीक मागितली जाते. नेमकं या भिकाऱ्यांचा व्यवसाय कसा चालतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल ना..

शहरातील उड्डाणपूल, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यावर थांबून वाहनधारक तसेच नागरिकांकडून भीक मागणारे अनेक भिकारी तुम्ही पाहिले असतील. लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत भिकाऱ्यांचा समावेश असतो, कोणी रेल्वेत भीक मागतं तर कोणी रस्त्यावर, हे भिकारी नेमकं कसं काम करतात हे तुम्हाला ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल.

कधी कधी तुम्हाला अशा बातम्या वाचायला मिळाल्या असतील की, एखाद्या भिकाऱ्याकडे कोट्यवधी संपत्ती आढळून आली, नोकरदार माणूसही कधी इतकी कमाई करु शकत नाही तेवढी कमाई भिकाऱ्याकडे असते.

मागे एकदा बातमी आली होती की, विजयनगरच्या साई मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याने मंदिरासाठी ८ लाखांची देणगी दिली, मंदिरात पैसे दिल्याने आपली कमाई वाढते असा दावा या भिकाऱ्याने केला होता.

अनेकदा भिकारी एखाद्या देवाचा फोटो वापरुन भीक मागत असल्याचं दिसतं. जम्मू-काश्मीरात भिकारी बनलेले दोन लहान मुलं कधी वैष्णवी देवीचा तर कधी भगवान शंकराचा फोटो एका थाळीत सजवून भीक मागण्यासाठी जातात.

प्रत्येक भिकाऱ्याचा स्वत:चा परिसर ठरलेला असतो. कधीकधी शहरातील गर्दीच्या ठिकाणी लहान मुलं भीक मागताना शॉपिंग मॉल्स, सिनेमा हॉलबाहेर गर्दीतील लोकांचा पाठलाग सोडत नाही, लोकांचे कपडे ओढून भीक मागितली जाते.

लहान मुलांच्या अशा वागण्याने लोकांना त्रास सहन करावा लागतो. इतकचं नाही तर हे भिकारी रविवारी वीक-ऑफही घेतात. जम्मू काश्मिरात भीक मागण्यावर बंदी नाही. शहरातील भिकाऱ्यांची संख्या प्रतिदिन वाढत चालली आहे. कधी कधी चौकाचौकात उभं असणाऱ्या भिकाऱ्यांच्या पाठलाग करण्याने अनेक अपघातही घडले आहेत.

अमर उजाला या हिंदी दैनिकाने केलेल्या सर्व्हेनुसार भिकाऱ्यांचे एक संघटन असते. सर्व भिकाऱ्यांना आपापला परिसर वाटून दिलेला असतो. त्यामुळे ठरवून दिलेल्या जागेतच यांना भीक मागावी लागते

भिकारी शुक्रवारी वैष्णवी देवीचा तर सोमवारी शंकराचा फोटो लावून भीक मागतात. मंगळवारी हनुमान, गुरुवारी साईबाबाच्या नावावर भीक मागतात.

भीक मागणाऱ्या मुलांना रोखण्यासाठी इंटिग्रेटेड चाइल्ड प्रोटेक्शन स्कीम सुरु आहे. यामध्ये लहान मुलांचे समुपदेशन केले जाते. चाइल्ड हेल्पलाइन १०९८ आणि स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते अशी माहिती प्रशासनाने दिली,

जम्मू काश्मीर हायकोर्टाने ऑक्टोबर २०१९ मध्ये भीक मागण्याबाबत प्रिवेंशन ऑफ बेगरी एक्ट १९६० आणि १०६४ असैविधानिक असल्याचं सांगितले. आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्षामुळे गरिबांना भीक मागावी लागते. गरिबांना सोयी-सुविधा न देऊ शकणे हे सरकारचं अपयश आहे.