पत्नीला विसरला, पत्नीने गर्लफ्रेंड बनून पुन्हा केलं लग्न...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:52 PM2021-06-30T20:52:52+5:302021-06-30T21:19:03+5:30

प्रेमाला वय नसतं आणि काही लोकं कितीही वयाची झाली तरी प्रेम करणं थांबवत नाहीत मग त्यांच्या मार्गात कितीही अडथळे येवोत. अशीच गोष्ट आहे ५६ वर्षाच्या पीटर आणि लिसाची. पीटरला तिच्या पत्नीला विसरुन गेला मात्र त्यांचे पुन्हा प्रेम झाले आणि त्यांनी पुन्हा लग्न देखील केले.

पीटर यांची पत्नी सांगते ते विसरुन गेले होते मी त्यांची पत्नी आहे. आमची प्रेमकथा, आमच्या लग्नाविषयी त्यांना काहीच आठवत नव्हते.

पीटर आणि लिसा यांची लव्हस्टोरी अनेक अडथळ्यांनी पुर्ण झाली होती. लिसा सांगते, पीटर यांना २० वर्षापुर्वी काय झालेले ते आठवायचे नाही. हे बघुन माझा जीव तुटायचा.

पीटर आणि त्यांची पत्नी घटस्फोटीत होते आणि एकमेकांच्या शेजारी राहायचे. हळुहळु त्यांच्यातील मैत्री वाढत गेली पण नेमके तेव्हाच त्यांनी राहण्याचे ठिकाण बदलले.

एका वर्षानंतर त्यांची पुन्हा भेट झाली आणि त्यांच्या प्रेमाला बहर आला त्यानंतर ते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर दोघांनी लग्न केले.

लिसा सांगते, ते आमच्या रिलेशनशिप बद्दल खुप सिरियस होते. ते माझ्यावर भरपूर प्रेम करायचे. ते मिश्किल तर होतेच पण फार रोमँटीकही होते.

मला हळुहळु लक्षात येऊ लागलं होत की त्यांना काही आजार असावा कारण ते सतत चावी अथवा पर्स विसरायचे. ते वाक्यातले शब्दही विसरायचे. त्यांना शब्द आठवणं कठीण होत होतं.

लिसा म्हणाली, आमच्या नातेवाईकांना तसेच मित्रमंडळींना कळून चुकले होते की त्यांच्या रोजच्या चालण्याबोलण्यात बदल होत चालला आहे. अखेरीस ३० ऐप्रिल २०१८ला आम्हाला समजलं की त्यांना अल्जायमर आहे

१२ डिसेंबर २०२० रोजी आम्ही टीव्ही बघत होतो तेव्हा एक लग्नाचा सिन चालू होता. मी तो पाहुन रडायला लागले. तेव्हा त्यांनी माझे डोळे पुसले आणि म्हणाले चल आपण लग्न करू.

त्यांना समजतही नव्हत की ते त्यांच्या पत्नीला पुन्हा प्रपोज करत आहेत. ते पुन्हा माझ्या प्रेमात पडले होते. मला राजकुमारी झाल्यासारखं वाटत होतं. मी त्यांना लगेच हो म्हटलं आणि आमचं पुन्हा एकदा लग्न झालं