How To Make Cooler At home: जबराट जुगाड! घरच्या घरीच बनवा तुमचा कुलर! एसीही होईल फेल; जाणून घ्या कसा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 05:01 PM2022-04-18T17:01:46+5:302022-04-18T17:06:33+5:30

How To Make your home Cool: एक जुगाड तुम्हाला थंडा थंडा कुल कुल करेलच विजेचे बिल आणि एसीचे हजारो रुपयेही वाचवेल.

सध्या उकाडा एवढा वाढलाय की, अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. कोळसा नसल्याने वीजेची टंचाईचे संकट देखील आवासून उभे आहे. आजकाल शहरातच नाही तर गावागावात देखील एसी दिसू लागले आहेत. यामुळे विजेचे बिल आणि विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशावेळी एक जुगाड तुम्हाला थंडा थंडा कुल कुल करेलच विजेचे बिल आणि एसीचे हजारो रुपयेही वाचवेल.

एसी कोणता घ्यावा, किती बिल काढेल आदीचे टेन्शनच गायब होणार आहे. बाजारात कुलरही मिळत आहेत. परंतू ते देखील ५-१० हजारांच्या आसपास मिळतात. शिवाय ते देखील एवढा थंडावा देऊ शकत नाहीत जेवढा तुम्हाला हा विदेशी जुगाडवाला कुलर देईल.

हा यासाठी तुम्हाला ईलेक्ट्रीकलचे थोडेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही कोणाचीतरी मदतही घेऊ शकता. परंतू, अर्धवट ज्ञानाने हे करायला जाऊ नका म्हणजे तुमच्या डोक्याचा ताप कमी होईल.

एक फॅन, बर्फ, एक कंटेनर (आईस बॉक्स) आणि एक आऊटलेट पाईप. आईस बॉक्स असेल तर बर्फ लवकर वितळणार नाही आणि शेतकरी असाल तर तुमच्याकडे एल आकाराचा पाईप कनेक्टर असेलच. नसेल तर तो तुम्हाला हार्डवेअरमध्ये मिळून जाईल. शिवाय काही नट आणि एक्स़ॉ ब्लेडही लागेल.

सर्वात आधी तुम्हाला आईस बॉक्स घ्यावा लागेल. त्याला एक छोटा फॅन बसेल असा आणि दुसरा पाईपच्या आकाराचा होल मारावा लागेल. त्याचे माप घेऊनच हे करावे, कारण जागा मोकळी राहिली तर हवा नीट येणार नाही.

फॅनच्या आकाराच्या भागात फॅन बसवावा, स्क्रूचा वापर करावा म्हणजे निसटणार नाही. पाईपच्या होलमध्ये पाईप बसवावा.

बाजारात २०-३० रुपयांना किंवा जास्तमध्ये बर्फाचा तुकडा मिळतो जो आपण रस्ना वगैरे बनविण्यासाठी वापरतो. किंवा जर तुमच्याकडे फ्रिज असेल तर त्यात तुम्हाला बर्फ बनविता येईल.

यानंतर आईस बॉक्स बंद करावा लागेल. फॅन चालू करून त्याची हवा पाईपमधून बाहेर येईल. ही हवा थंड असेल. बर्फ मोठा असेल तर बराच काळ त्याची थंड हवा तुम्हाला मिळत राहील. या साऱ्यासाठी जास्तीतजास्त दीड हजार रुपये खर्च येईल.