सेक्स वर्करचं काम करून रोज कमावत होती ८८ हजार रूपये, आता सांगितलं Escort Life चं सत्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 04:47 PM2021-08-04T16:47:09+5:302021-08-04T16:56:48+5:30

१८ वर्षांची असताना एक वेळ अशी आली की, ती रोज ८८ हजार रूपये कमावू लागली होती. आधी तिने शुगर बेबीसारखं काम केलं.

प्रत्येत व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येतात. काही लोक त्यांच्यासमोर गुडघे टेकतात. पण काही लोक त्या अडचणींचा हिंमतीने सामना करतात. अशाच एका तरूणीने तिच्या आयुष्यातील अडचणींचा सामना केला आणि आज ती तिचं जुनं आयुष्य त्यागून एका नव्या जीवनाकडे जात आहे.

मेव मून नावाची तरूणी सेक्स वर्कर म्हणून काम करत होती. पण एक वेळ अशी आली की, तिने तिचं जीवन बदलण्याचा निर्धार केला आणि आज ती दुसऱ्या महिलांना जागरूक करते.

मेव जेव्हा ४ वर्षांची होती तेव्हा एका तरूणीने तिचं लैंगिक शोषण केलं होतं. त्या घटनेनंतर मेवला हेच वाटू लागलं होतं की, तिचं शरीर केवळ संभोगाची वस्तु आहे. ज्या माध्यमातून ती पैसा कमावू शकते.

इंग्लंडच्या बर्नलेमध्ये राहणारी मेव जेव्हा १६ वर्षांची झाली तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला भेटली. त्याने डेटच्या बहाण्याने तिला ड्रग्स देऊन बेशुद्ध केलं आणि तिचा रेप केला.

लैंगिक शोषणाच्या या दोन घटनांनंतर मेवचा स्वत:बद्दलचा दृष्टीकोन बदलला. तिला वाटू लागलं की, शरीर विकून पैसे कमावने चांगली पद्धत आहे. यानंतर ती सेक्स वर्कर म्हणून काम कर लागली.

१८ वर्षांची असताना एक वेळ अशी आली की, ती रोज ८८ हजार रूपये कमावू लागली होती. आधी तिने शुगर बेबीसारखं काम केलं. ज्यात ती जास्त वयाच्या लोकांना आपल्या प्रेमाच्या जाळात फसवत होती आणि शरीरसंबंधाच्या बदल्यात पैसे घेत होती.

नंतर तिला वाटलं की, शुगर बेबीचं काम करताना त्यांना रिलेशनशिपमध्ये रहावं लागतं. म्हणून तिने एस्कॉर्ट म्हणून काम करणं सुरू केलं. गेल्या काही वर्षात तिने इंग्लंडच्या अनेक वेश्यालयात काम केलं आणि बरेच पैसेही कमावले. तिला चरस आणि गांज्याची सवय लागली होती.

तिने लॅंस लाइव वेबसाइटसोबत बोलताना सांगितल की, 'माझे ग्राहक टिंडरच्या माद्यमातून मला भेटायला येत होते. आणि ते मला केवळ वीड देत असतील तर मी त्यांना काहीही करण्याची परवानगी देत होते'.

मेवला बऱ्याच वर्षांपासून सेक्स इंडस्ट्री सोडायची होती. पण ती वाईटप्रकारे अडकली होती. तिला नशेची सवय लागली होती आणि लंडनमधील फ्लॅटचा भाडंही द्यायचं होतं. २०१९ मध्ये तिने हे जीवन बदलण्याचा निर्णय घेतला.

ती काही दिवसांच्या सुट्टीवर होती. तेव्हा तिने खूप विचार केला आणि ते करत असलेलं काम तिने सोडलं. आता मेव तरूणींना हे समजावते की, जर पैसे बाजूला केले तर तुम्ही सेक्स वर्कर म्हणून काम कराल का? तिचं म्हणणं आहे की, पैशांना केवळ आधार बनवनं चुकीच आहे.

आता ती एका इन्स्ट्रक्टरसारखी त्या लोकांची मदत करते ज्यांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला आणि ट्रॉमा सहन करावा लागला. मेवला मनोवैज्ञानिक व्हायचं आहे. आणि इतरांना त्या क्षेत्रातून बाहेर येण्यास मदत करायची आहे.

Read in English