भींतीवरच बर्फाचा अनुभव, या अनोख्या पेटिंग्स तयार करुन पित्याने केले मुलींना खुश...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 07:11 PM2021-12-14T19:11:58+5:302021-12-14T19:24:55+5:30

फेस्टिव्ह सीजनमध्ये प्रत्येकाला वाटतं की त्यांनी आपल्या मुलांना असं काही गिफ्ट द्यावं की ते खुश व्हायला हवेत. आपल्या घरातच बर्फाच्छादित प्रदेश तयार केल्यामुळे आता त्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे.

फेस्टिव्ह सीजनमध्ये प्रत्येकाला वाटतं की त्यांनी आपल्या मुलांना असं काही गिफ्ट द्यावं की ते खुश व्हायला हवेत. United Kingdom मधील एश्टनमध्ये राहणाऱ्या स्कॉट विलकॉक यांनी ख्रिसमसनिमित्त असंच काही आगळंवेगळं गिफ्ट आपल्या मुलांना दिलं आहे.

ख्रिसमसशी संबंधित चित्र आणि उत्तर ध्रुवातील सुंदर बर्फाचे दृश्य स्कॉटने स्वतःच्या हातांनी घराच्या खिडकीवर काढलेलं आहे.

Miracle On 34th Street आणि The Snowman सारख्या चित्रपटांमधील 34 वर्षीय स्कॉट विल्कॉकच्या बारकाईने रेखाटलेल्या दृश्यांचं फार कौतुक होत आहे.

स्कॉट हे पूर्वी एक मेकॅनिक होते परंतु त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ग्राफिटी कलेला कधीच इतक्या गांभीर्याने घेतलं नव्हतं. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्यातील या कलेला पुनरूज्जीवीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

त्यांनी आपली नोकरी करत असताना जेव्हा त्यांच्या बॉसने त्यांना घराची खिडकी रंगवायला लावली तेव्हा त्यांना आपल्यात काय कला आहे कळाली. त्यानंकर स्कॉट यांनी नोकरी सोडून ग्राफिटीत त्यांचं करिअर बनवलं.

Snow Graffiti हे त्यांच्या कंपनीचं नाव असून त्यांना वैयक्तिकरित्या स्नो ग्राफिटीचं काम करायला आवडतं. डिज्नी कॅरेक्टर्स आणि आणि बर्फाच्छादित रस्ते यांचं पेन्टिंगही त्यांनी अतिशय उत्तमरित्या केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना फेस्टिव्ह सीजनमधील दृष्य रेखाटायलाही फार आवडतात.

डेली मेलने जारी केलेल्या रिपोर्टनुसार स्कॉट सांगतात की, 'खिडकीवर अशी मनमोहक दृश्यं पाहणं लोकांना फार आवडतं'.

त्यांनी इन्स्टाग्रामवरदेखील त्यांचे हे फोटोज आणि व्हिडिओ टाकलेले आहे. तर टिकटॉकवर त्यांचे १ लाख ७० हजार फॉलोअर्स आहेत.