हौसेला मोल नाही! लेकीसाठी वडिलांनी थेट चंद्रावर घेतली जमीन; वाढदिवसाला दिलं स्पेशल गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:25 AM2023-08-09T10:25:30+5:302023-08-09T10:34:10+5:30

हिमाचल प्रदेशातील एक वकीलाने आपल्या मुलीसाठी चंद्रावर जमीन घेतल्याची घटना घडली आहे.

काही लोक हौसेसाठी काहीही करतात. म्हणूनच हौसेला मोल नाही असं म्हटलं जातं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ग्रह-तारे हे सर्वांनाच खुणावत असतात. चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा अनेकांनी कधीतरी मनोमन विचार देखील केला असेल. पण आता एका हौशी व्यक्तीने थेट चंद्रावरच जमीन विकत घेतली आहे.

हिमाचल प्रदेशातील एक वकीलाने आपल्या मुलीसाठी चंद्रावर जमीन घेतल्याची घटना घडली आहे. अमित शर्मा असं या वकीलाचं नाव असून त्यांनी त्यांच्या मुलीला वाढदिवशी जमिनीचा हा तुकडा खास भेट म्हणून दिला आहे.

हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील वकिलाने आपल्या लाडक्या लेकीसाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. मोठी मुलगी तनिशा शर्मा हिला तिच्या 18व्या वाढदिवसानिमित्त चंद्रावर एक हेक्टर जमीन भेट देण्यात आली आहे.

अमित यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवसाला वेगळं गिफ्ट देण्याचा विचार केला होता. म्हणून त्यांनी चंद्रावर जमीन खरेदी करून आपल्या मुलीला भेट दिली. चंद्रावर जमीन खरेदी केल्यानंतर अमित आणि कुटुंबीयांना खूप आनंद होत आहे.

अमित कुमार म्हणाले की, मोठी मुलगी तनिषा शर्माच्या नावावर त्यांनी अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या लुना सोसायटी इंटरनॅशनलकडून चंद्रावर एक हेक्टर जमीन खरेदी केली आहे. त्यांनी सांगितले की यूएसए कंपनीकडून जमीन खरेदी केली आणि एक हेक्टर जमिनीसाठी तीनशे डॉलर्स खर्च केले.

आपल्या मुलीला वेगळे गिफ्ट देण्याच्या इच्छेमुळेच त्यानी हे केलं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, आता माझी मुलगी पृथ्वीवरूनच पाहू शकते की माझी जमीन चंद्रावरही आहे. अमित शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी 4 जुलै रोजी अर्ज केला होता आणि पैसे ईमेलद्वारे पाठवले होते.

अमित शर्मा यांनी सांगितले की, मुलगी तनिषा शर्मा चंदीगडमध्ये शिकत आहे आणि क्लासेस सुरू असल्याने तिच्या वाढदिवसालाही ती घरी येऊ शकली नाही. सध्या या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

(सर्व फोटो - News18 हिंदी)