बापरे! ९ कोटी रुपयांचा चहा, बघा आणखी कोणते आहेत असे अफलातुन महागडे चहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 06:48 PM2022-11-17T18:48:35+5:302022-11-17T19:01:17+5:30

जगभरात चहाप्रेमी लोक काही कमी नाहीत. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवला जातो. पावसाळ्यात, थंडीत तर गरमागरम चहा प्यायची मजा काही औरच असते. पण या चहावर तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे खर्च कराल? फारफार तर १००-१५० रुपयांचा चहा आपण पिऊ. पण चहासाठी कोणी ९ कोटी रुपये खर्च करेल का? तुम्ही म्हणाल यात तर एक फ्लॅट येईल. तर हो एक किलो चहाची किंमत काही हजारांपासून ९ कोटी रुपयांपर्यंत सुद्धा आहे. कुठे मिळतो असा अफलातुन चहा बघुया.

जगातला सर्वात महागडा चहा आहे चीनमध्ये. da-hong pao tea दा होंग पाओ टी या चहाचे नाव. चीनच्या फुजियान प्रांतात वुई डोंगरात या चहाची शेती होते. याच्या दुर्लभतेचा समावेश राष्ट्रीय खजानानेही केला आहे. याची किंमत प्रतिकिलो १.२ मिलियन डॉलर म्हणजेच ९ कोटी रुपये आहे. याचा इतिहास मिग राजवंश सोबत जोडलेला आहे.

Panda Dung Tea पांडा डंग टी हा जगातला दुसरा सर्वात महाग चहा आहे. याचे नाव असे का तर पांडा या प्राण्याच्या गोबरचा वापर या चहाच्या शेतीमध्ये केला जातो. या एक किलो चहाची किंमत ७० हजार डॉलर म्हणजेच ५७ लाख रुपये आहे.

Yellow gold tea buds जगातील तिसरा महाग चहा येल्लो गोल्ड टी बड्स हा आहे. हा एक दुर्लभ चहा आहे. याची पाने सोन्यासारखी चमकतात. शेतीदरम्यान या चहाचे पानं वर्षातून केवळ एकदाच काढले जातात, तेही सोन्याच्या कात्रीने. याची किंमत ७८०० डॉलर म्हणजेच ६ लाख रुपये आहे.

Silver tips Imperial tea महागड्या चहांमध्ये भारतही मागे नाही. सिल्व्हर टिप्स इंपेरियल टी हा आणखी महाग चहा भारतात दार्जिलिंग मध्ये आहे. याची पानं फक्त पौर्णिमेच्या रात्री तोडली जातात. दार्जिलिंगच्या डोंगरावर मकाइबारी टी इस्टेट मध्ये याची शेती होते. याची दिड लाख रुपये आहे.