दिसतं तसं नसतं! डोळ्यांना सुंदर दिसणारे हे पदार्थ आहेत खोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 02:57 PM2018-10-07T14:57:23+5:302018-10-07T15:01:15+5:30

ओर्जिता दोगीपार्थी नावाची 22 वर्षीय तरुणी ओरिगामीत निष्णात आहे. रंगीबेरंगी कागदांचा वापर करुन ती उत्तमोत्तम गोष्टी साकारते. तिनं कागदापासून तयार केलेले खाद्यपदार्थदेखील अगदी अस्सल भासतात.

ओर्जिता तिच्या आईकडून ओरिगामी शिकली. अगदी लहान असताना ओर्जिताला तिची आई ओरिगामी शिकवायची. नंतर तिला त्यात रस निर्माण झाला. मग तिनं एकापेक्षा एक सुंदर कलाकृती साकारल्या.

ओर्जितानं फूड केमिस्ट्री आणि फूड प्रोसेसिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे.

ओरिगामी ही मूळची जपानी कला आहे. यामध्ये कागदाच्या मदतीनं लहान लहान वस्तू तयार केल्या जातात.

ओर्जिताला खाद्यपदार्थ विशेष आवडतात. त्यामुळे ती अनेकदा कागदांपासून खाद्यपदार्थ तयार करते. ती इतके हुबेहून खाद्यपदार्थ साकारते की ते कागदापासून तयार करण्यात आले आहेत, हे अनेकांच्या लक्षात येत नाही.