पाण्यात रस्ता आला कुठून, त्यातही रेल्वे? व्हायरल झालेल्या फोटोची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 08:45 PM2023-01-17T20:45:35+5:302023-01-17T21:04:32+5:30

येथील फ्रँकफर्ट शहराजवळील २० किमी परिसर जलमय झाला असून आजुबाजूला पाणीच पाणी झालं आहे.

जर्मनीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. शेती पिकांसह नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

येथील फ्रँकफर्ट शहराजवळील २० किमी परिसर जलमय झाला असून आजुबाजूला पाणीच पाणी झालं आहे.

मुसळधार पाऊस आणि बर्फ वितळल्यामुळे येथील हाईन नदीला पूर आला असून पुराचे पाणी शहरात शिरल्याचं दिसून येत आहे.

या पुराचे पाणी प्रँकफर्टजवळच्या निदेराऊ-इचेन भागात शिरले आहे. त्यामुळे, येथील अनेक मैदान, शेती आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

पुराच्या पाण्याने वेढलेल्या रुळावरुन चाललेल्या रेल्वेचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे. रस्ता, रेल्वे ट्रॅक आणि पाणी यांचा तिहेरी संगम व तेथूनच धावणारी रेल्वे हे दृश्य मनमोहक दिसते.

जर्मनीतील फ्रँकफर्ट परिसरात रेल्वे क्रॉसिंगवर दोन पुरुष त्यांची बोट ओढताना दिसून येतात. मुसळधार पावसाने येथील शेततळे जलमय झाले होते. त्यामुळे, परिसराला पावसाच्या पाण्याने असा वेढा दिलाय.

दरवर्षी जानेवारी महिन्यात येथील परिसरात मुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण होते.

हे छायाचित्र पाहून पाण्यातच रस्ता कसा तयार झाला, असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही.