Russia Ukraine War : न्युक्लिअर फोर्स अलर्टवर NATO प्रमुखांची प्रतिक्रिया, "पुतिन यांची पद्धत धोकादायक आणि बेजबाबदार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 08:29 AM2022-02-28T08:29:18+5:302022-02-28T08:39:04+5:30

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेल्या युद्धाने धोकादायक वळण घेतले आहे.

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेल्या युद्धाने धोकादायक वळण घेतले आहे. युक्रेनने रासायनिक हत्यारांचा वापर केल्याचा आरोप रशियन प्रसारमाध्यमांनी केला.

तर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी न्युक्लिअर फोर्सला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पुतीन यांच्या आदेशामुळे संपूर्ण जगानंच आश्चर्य व्यक्त केलं. अमेरिकेसह नाटो प्रमुखांनी (NATO chief) हा निर्णय धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) आपल्या कृतीने धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहेत, अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने दिली.

दरम्यान, युक्रेनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी आपल्या न्युक्लिअर फोर्सला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. पुतीन यांच्या आदेशाने सर्व पाश्चिमात्य देशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

रशियाच्या न्युक्लिअर फोर्सला अलर्ट करणे हा त्यांचा धोकादायक दृष्टीकोन आहे. पुतिन यांचा हा धोकादायक आणि बेजबाबदार दृष्टिकोन आहे, अशी प्रतिक्रिया नाटो प्रमुखांनी दिली.

त्याचबरोबर या प्रकरणी अमेरिकेकडूनही प्रतिक्रिया उमटली आहे. पुतिन उचलत असलेल्या पावलांमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहेत. न्युक्लिअर फोर्सना अलर्ट करण्यातून त्यांचा धोकादायक दृष्टिकोन दिसून येतो, असं व्हाईट हाऊसनं म्हटलंय.

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो जण अगंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत आता अमेरिकेने युक्रेनला मानवतावादी गरजा आणि पीडितांना मदत म्हणून ५४ दशलक्ष डॉलर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिका युक्रेनच्या लोकांना सुमारे ५४ दशलक्ष डॉलर्सची अतिरिक्त मदत देत आहे. ही मदत मानवतावादी संस्थांना आधीच गरजू असलेल्या युक्रेनियन नागरिकांना आणि रशियाच्या अकारण आणि अन्यायकारक हल्ल्यामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी दिली जात असल्याची प्रतिक्रिया या संदर्भातील माहिती देताना अमरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिली.

युक्रेनवर रशियाचे हल्ले अद्यापही सुरू आहेत. २४ फेब्रुवारीपासून रशिया सातत्यानं युक्रेनवर हल्ले करतोय. रशियाच्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अधिकृतरित्या ३५२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये. यामध्ये १६ मुलांचाही समावेश आहे.