Bilawal Bhutto: तेव्हा ११ वर्षे मोठ्या हिना रब्बानींसोबत रंगेहात पकडले गेले होते बिलावल भुत्तो, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 08:35 AM2023-05-05T08:35:52+5:302023-05-05T08:41:04+5:30

Bilawal Bhutto & Hina Rabbani Khar: शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो जरदारी गोव्यात आले आहे. कुटुंबात राजकीय वारसा असलेले बिलावल भुत्तो हे त्यांच्या राजकीय जीवनाबरोबरच खासगी आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेच असतात. त्यांच्या एका सिक्रेट अफेअरची एकच चर्चा रंगली होती.

शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो जरदारी गोव्यात आले आहे. कुटुंबात राजकीय वारसा असलेले बिलावल भुत्तो हे त्यांच्या राजकीय जीवनाबरोबरच खासगी आयुष्यातील घडामोडींमुळेही चर्चेच असतात. त्यांच्या एका सिक्रेट अफेअरची एकच चर्चा रंगली होती.

बिलावल भुत्तो हे २०११ नंतर भारताचा दौरा करणारे पाकिस्तानचे पहिले परराष्ट्र मंत्री ठरले आहेत. ते एससीओच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एससीओचे वर्तमान अध्यक्ष एस. जयशंकर यांनी बिलावल भुत्तो यांना निमंत्रण पाठवले होते.

दरम्यान, एकेकाळी पाकिस्तानमधील प्रभावशाली महिला राजकारणा हिना रब्बानी खार आणि बिलावल भुत्तो यांच्यातील अफेअरची चर्चा पाकिस्तानच्या राजकारणात खूप रंगली होती. हिना रब्बानी ह्या मंत्री बनल्या तेव्हा त्यांचं नाव बिलावल भुत्तो यांच्याशी जोडले गेले होते.

हिना रब्बानी खार आणि बिलावल भुत्तो यांच्यात प्रेमप्रकरण सुरू आहे, याचा गौप्यस्फोट सर्वप्रथम २०१२ मध्ये झाला होता. त्यावेळी बिलावल भुत्तो हे २४ वर्षांचे तर हिना रब्बानी ह्या ३५ वर्षांच्या होत्या.

बिलावल भुत्तो आणि हिना रब्बानी यांच्यातील प्रेम आणि रोमान्सबाबत सर्वप्रथम बांग्लादेशी टॅब्लॉईड द वीकली ब्लिट्झ ने वृत्त प्रकाशित केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला होता.

हिना रब्बानी खार पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सदस्य आहेत. त्यांनी फेब्रुवारी २०११ पासून २०१३ पर्यंत पाकिस्तानच्या २१व्या परराष्ट्रमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. राजकीय कौशल्याबरोबरच हिना रब्बानी ह्या त्यांच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहेत.

बांगलादेशमधील या वृत्तपत्राने दावा केला होता की, तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी हिना रब्बानी खार यांना बिलाबल भुत्तोंसोबत पाकिस्तानच्या राष्ट्रपती भवनात आक्षेपार्ह स्थितीत पकडले होते. त्यावरून मोठा वाद झाला होता. मात्र हे प्रकरण नंतर गुपचूप मिटवण्यात आलं.