Thailand Princess Sirivannavari, Army: फॅशन डिझायनर ते 'आर्मी मेजर जनरल'... देशरक्षणासाठी सज्ज झाली 'राजकन्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 05:21 PM2023-03-13T17:21:19+5:302023-03-13T17:35:39+5:30

राजकन्येचा स्वत:चा लोकप्रिय असा फॅशन ब्रँडदेखील आहे

Thailand Princess Sirivannavari: थायलंडच्या राजघराण्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या राजकुमारी सिरिवन्नावरी नारीरत्न राजकन्या हिला लष्करात मेजर जनलर म्हणून नेमण्यात आले आहे.

थायलंड मिलिटरी प्रमोशन्समध्ये यंदा राजकुमारीचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे ती आर्मीची मेजर जनरल म्हणजेच प्रमुख असणार आहे.

राजकुमारी सिरिवन्नावरी हिला फॅशन डिझायनिंगची नेहमीच आवड होती. त्यामुळे तिने राजघराण्यातील असूनही सुरूवातीपासूनच फॅशन डिझायनिंगमध्ये करियरचा विचार आणि हाच व्यवसाय निवडला.

राजकुमारी सिरिवन्नावरी हिने पॅरिसमधून डिझाइनमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतले आहे. ती एक ख्यातनाम फॅशन डिझायनर आहे. तिच्या ब्रँडचे नाव सिरिवन्नावरी आहे.

राजकन्या सिरिवन्नावरी ही १ एप्रिलपासून आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. अतिशय सुंदर दिसणारी सिरिवन्नावरी ही थायलंडचा राजा वजिरलंकरन याची धाकटी मुलगी आहे.

सिरिवन्नावरीची मोठी बहीण राजकुमारी बज्रकितियाभा ही नरेंद्ररा देब्यावती हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. हृदयाच्या आजारामुळे ती गेल्या वर्षी डिसेंबरपासून बेशुद्ध आहे.

राजा वजिरलंकरन यांनी तीन विवाह केले आहेत. त्यांच्या सात मुलांपैकी बज्रकितियाभा हा सर्वात मोठा आहे आणि तीच राजगादीची संभाव्य उत्तराधिकारी होती.

पण काही विश्लेषकांच्या मते, बज्रकितियाभा हृदयाच्या आजाराने त्रस्त अशून डिसेंबरपासून कोमात गेल्याने आता सिरिवन्नावरी हिला थायलंडचे सिंहासन मिळू शकते.

सिरीवन्नावरी फॅशन डिझायनर बनण्याआधी एक बॅडमिंटनपटू देखील होती. दक्षिण पूर्व आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तिला घोडेस्वारीतही खूप रस आहे.