Russia Ukrane War: युक्रेनने 'आपलीच' अजस्त्र युद्धनौका बुडवली; पण धक्का मॉस्कोपर्यंत पुतीनना बसला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 01:18 PM2022-04-15T13:18:11+5:302022-04-15T13:25:12+5:30

who Sinks Warship Moskva In Black Sea: मोस्कवा युद्धनौकेच्या कहान्या खूप रंजक आहेत. रशियाच्या या युद्धनौकेवरील हल्ला हा नौदलाच्या इतिहासातील आजच्या काळातला सर्वात मोठा हल्ला अशी नोंद होणार आहे.

युक्रेन युद्धाच्या ५० व्या दिवशी रशियाला तगडा झटका बसला आहे. काळ्या समुद्रात तैनात असलेल्या रशियन नौदलाच्या ताफ्यातील प्रमुख युद्धनौका मोस्कवाचे युक्रेनने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्धनौकेतील स्फोटकांना आग लागल्याने ही घटना घडल्याचे म्हटले आहे.

युक्रेनच्या दाव्यानुसार नेप्च्यून क्रूझ मिसाईल आणि तुर्कीच्या बायरकतार टीबी-2 ड्रोनच्या मदतीने या अजस्त्र युद्धनौकेला उद्ध्वस्त केले. दुसऱ्या महायुद्धावेळी १९४१ नंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाने रशियासारख्या शत्रूची युद्धानौका उडविली आहे. या युद्धनौकेने एकेकाळी व्लादिमीर पुतीन यांचीदेखील सुरक्षा केली होती.

या मोस्कवा युद्धनौकेच्या कहान्या खूप रंजक आहेत. ती 12500 टन वजनाची होती. तर ६०० फूट लांबीची. सोव्हिएत संघापासून नौदलाची शान असलेल्या युद्धनौकेवर हल्ला झाल्याने हा युक्रेनचा मानसिकदृष्ट्या विजय असल्याचे म्हटले जात आहे.

रशियाच्या या युद्धनौकेवरील हल्ला हा नौदलाच्या इतिहासातील आजच्या काळातला सर्वात मोठा हल्ला अशी नोंद होणार आहे. १९४१ मध्ये असा शेवटचा हल्ला झाला होता. जर्मनीच्या डायव्हर्सनी सोव्हिएतच्या मराट युद्धनौकेला क्रोन्‍शटडट बंदरावर उद्ध्वस्त केले होते.

जर आजच्या मोस्कवा युद्धनौकेवरील स्फोटकांना आग लागल्याने अशी घटना घडली असेल तर ती अशाप्रकारची दुसरी घटना असेल. 1916 इम्‍पेरतरिश्‍ता मारिया युद्धानौका स्फोटकांमुळे बुडाली होती.

तज्ज्ञांनुसार पहायला गेले तर मोस्कवा बुडाल्यामुळे युक्रेन युद्धावर कोणताही फरक पडणार नाही. रशियन सैन्य विश्लेषक अलेक्‍जेंडर ख्रमचिखिन यांच्यानुसार ही युद्धनौका खूप जुनी होती. तिला पुढील पाच वर्षांत नष्ट करण्याची य़ोजना होती. याचे युद्धाशी जरी संबंध नसले तरी युक्रेनला निशस्त्र करण्याच्या अभियानावर काहीही परिणाम होणार नाही.

रशियाकडे या श्रेणीतील आणखी दोन जहाजे आहेत. मार्शल उस्तिनोव आणि वारयाग अशी त्यांची नावे आहेत. परंतू ती दुसरीकडे तैनात आहेत. ही जहाजे अँटी शिप आणि हवेत मारा करू शकणाऱ्या मिसाईलने लेस आहेत.

खरेतर 1970 च्या दशकात अमेरिकेच्या एअरक्राफ्ट कॅरिअरला टक्कर देण्यासाठी ही युद्धानौका तयार करण्यात आली. समुद्रात सोव्हिएतच्या युद्धनौकांना हवाई सुरक्षा देणे हे तिचे काम होते. तेव्हा तिला एअरक्राफ्ट कॅरिअर किलर असे म्हटले जायचेय १९८३ मध्ये ही युद्धनौका सोव्हिएतच्या नौदलात सहभागी झाली.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही युद्धानौका सोव्हिएत युक्रेनने बनविलेली होती. तेव्हा तिचे नाव स्लावा किंवा ग्लोरी (शान) असे ठेवण्यात आले होते. १९९५ मध्ये युद्धनौका रशियाकडे गेली आणि तिचे नाव राजधानी मॉस्कोवरून मोस्कवा करण्यात आले.

त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ही युद्धनौका जरी अमेरिकेला प्रत्यूत्तर देण्यासाठी बनविण्यात आली असली तरी तिने एकेकाळी संकटात सापडलेल्या सोवियत नेता मिखाइल गोर्बाचोव, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश सीनियर यांना माल्टामध्ये डिसेंबर १९८९ मध्ये संरक्षण पुरविले होते.

व्लादिमीर पुतीन यांनी देखील या युद्धनौकेवर जगभरातील नेत्यांसोबत बैठका केल्या आहेत. 2014 मध्ये क्रीमियावर जेव्हा हल्ला केला तेव्हा युक्रेनी नौदलाला ब्लॉक याच युद्धनौकेने केले होते. 2015 मध्ये सिरियामध्ये देखील हवाई संरक्षण पुरविले होते.