Russia Ukraine War: युक्रेनची ब्युटी क्विन, आधी सौंदर्याने केले घायाळ, आता देशाच्या शत्रुविरोधात उचलले हत्यार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 03:34 PM2022-02-27T15:34:57+5:302022-02-27T15:39:40+5:30

Russia Ukraine War: बलाढ्य रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून चिवटपणे प्रतिकार केला जात आहे. सामान्य लोकही रशियन सैन्याविरोधात हत्यार हाती घेतल आहे. त्यात आता युक्रेनची ब्युटी क्विन आणि माजी मिस ग्रँड युक्रेन अनास्थासिया लेना हिनेही शस्त्र हाती घेतले आहे.

बलाढ्य रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून चिवटपणे प्रतिकार केला जात आहे. सामान्य लोकही रशियन सैन्याविरोधात हत्यार हाती घेतल आहे. त्यात आता युक्रेनची ब्युटी क्विन आणि माजी मिस ग्रँड युक्रेन अनास्थासिया लेना हिनेही शस्त्र हाती घेतले आहे. अनास्थासिया लेना हिने सैन्यात प्रवेश केला आहे. तसेच इन्स्टाग्रामवर हत्यारांसह फोटो पोस्ट केला आहे.

अनास्तासिया लेना हिने २०१५ मध्ये २४व्या वर्षी मिस ग्रँड युक्रेनचे विजेतेपद पटकावले होते. मात्र आता तिने युक्रेनच्या संरक्षणासाठी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

युक्रेनच्या सैन्यात दाखल होण्यापूर्वी तिने तुर्कीमध्ये पब्लिक रिलेशन मॅनेजर म्हणून काम पाहिले होते. ती याआधीही हत्यारांसह दिसली होती. मात्र ती नकली हत्यारे होती. तसेच त्यामधील गोळ्या ह्या प्लॅस्टिकच्या होत्या.

इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवर अनास्थासियाच्या फोटोंमध्ये ती सैन्यासह जंगलामध्ये आणि इंडोअर ट्रेनिंग ग्राऊंडमध्ये सराव करताना दिसत आहेत. आता ती हा अनुभव युद्धाच्या मैदानात वापरणार आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या आठवड्यात युक्रेनवर हल्ला करण्याचा आदेश दिल्यानंतर तिने आपल्या देशाच्या समर्थनार्थ सोशल मीडियाचा आधार घेतला होता.

शनिवारी अनास्थासियाने इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या पद्धतीचे देशभक्तिपर मजकूर शेअर केले आहेत. तिने रशियन सैनिकांना इशाराही दिला आहे.

एका अन्य पोस्टमध्ये तिने युक्रेमध्ये आतापर्यंत सामान्य जनता आणि सैनिकांनी केलेल्या प्रतिकाराचे कौतुक केले आहे.

अनास्तासियाने ब्युटी क्विनसोबतच स्लाविस्टिक युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग अँड मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवलेली आहे. ती युक्रेनियन नागरिकांना रशियाविरोधात उभे राहण्याचे आवाहन करत आहे.