Rishi Sunak: ऋषी सुनक आहेत कोट्यावधींचे मालक; मात्र पत्नी अक्षता यांच्याकडे त्यांच्याहून अधिक संपत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 12:21 PM2022-10-25T12:21:31+5:302022-10-25T12:42:34+5:30

Rishi Sunak: ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक (४२ वर्षे) यांची बिनविरोध झाली आहे.

हुजूर (कॉन्झर्वेटिव्ह) पक्षाचा प्रमुख नेता होण्याच्या शर्यतीतून ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, पेनी मोरडॉन्ट या दोन प्रतिस्पर्ध्यांनी आता माघार घेतली आहे. त्यामुळे या पक्षाचा प्रमुख नेता म्हणून तसेच ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक (४२ वर्षे) यांची बिनविरोध झाली आहे. सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे पहिली भारतीय वंशाची व सर्वात तरुण व्यक्ती आहे.

हुजूर पक्षाच्या प्रमुख नेतेपदासाठी निवडणूक लढविण्याची ही योग्य वेळ नाही, असे कारण देत बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतली होती. त्यानंतर आणखी एक उमेदवार पेनी मोरडॉन्ट यांनीही सोमवारी उमेदवारी मागे घेतली. ब्रिटनमधील आर्थिक पेचप्रसंगावर पंतप्रधान लिझ ट्रस यांनी केलेल्या उपाययोजना वादग्रस्त म्हणून ठरल्या होत्या. त्यांना अवघ्या ४५ दिवसांत पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे हुजूर पक्षाचा प्रमुख नेता तसेच नवा पंतप्रधान निवडण्याची पक्षांतर्गत प्रक्रिया हजुर पक्षात सुरू झाली होती. दोन प्रतिस्पर्थ्यांनी माघार घेतल्याने सुनक यांची त्या पक्षाच्या प्रमुख नेतेपदी व पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

ऋषी यांचे आई-वडील पंजाबचे. त्यानंतर ते विदेशात स्थायिक झाले. ऋषी यांचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. त्यांनी अमेरिकेतील स्टँडफोर्ड विद्यापीठात एमबीए केले आहे. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात राजकारण आणि अर्थशास्त्राचे घडे घेतले आहेत. ऋषी हे भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. राजकारणात येण्याअगोदर ऋषी हे इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमॅन सॅश आणि हेज फंड यामध्ये काम करत होते. त्यानंतर त्यांनी इन्व्हेस्टमेंट फर्मची स्थापनाही केली होती.

कोरोनाकाळात त्यांनी ब्रिटनला आर्थिक मंदीतून बाहेर काढले. सर्व वर्गातील लोकांना खूश केले. २०२० मध्ये हॉटेल इंडस्ट्रीला बूस्टर दिला. इट आउट टू हेल्प आउट ही योजना आणली. त्यामुळे १५ हजार कोटीची मदत झाली. कर्मचारी, व्यावसायिकांना ऑगस्ट २०२१ मध्ये २ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले. कोरोनामुळे डबघाईस आलेल्या पर्यटन व्यवसायाला १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले.

७३०० कोटी रु. अधिक संपत्तीचे ऋषी सुनक मालक आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याहून अधिक संपत्ती त्यांच्या पत्नी अक्षता यांच्याकडे आहे.