New Wuhan Lab in Pakistan: वुहान झालं! आता पाकिस्तानात कोरोनापेक्षाही खतरनाक जैविक हत्यारे तयार करतोय चीन, तज्ज्ञ हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 08:11 PM2022-04-14T20:11:23+5:302022-04-14T20:27:28+5:30

bioweapons research under Pakistan Army cover: कोरोना चीनला आता विळखा घालून बसलेला असताना नवीन गौप्यस्फोट झाला आहे. चीनचे लोक भुकेने व्याकूळ झाले आहेत, पोटाला काहीतरी अन्न मिळावे म्हणून ते लॉ़कडाऊन तोडून जेलमध्ये जात आहेत.

दोन वर्षांपूर्वी वुहानच्या लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार करण्यात आला होता. तो जगभर पसरला आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला. हाच कोरोना चीनला आता विळखा घालून बसलेला असताना नवीन गौप्यस्फोट झाला आहे. चीनचे लोक भुकेने व्याकूळ झाले आहेत, पोटाला काहीतरी अन्न मिळावे म्हणून ते लॉ़कडाऊन तोडून जेलमध्ये जात आहेत.

चीन पाकिस्तानात कोरोनाच्याच धर्तीवर असे खतरनाक व्हायरस तयार करत आहे की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर मानवजात नष्ट होईल. तसेच या व्हायरसवर लस, औषधेही नाहीत. तज्ज्ञांनुसार चीनमधील सत्ताधारी पक्ष सीसीपी जैविक हत्यारे बनवत आहे. हा कट पाकिस्तानात शिजत आहे.

वृत्तसंस्था एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. तज्ज्ञ आणि शोध पत्रकार अंथनी क्लेन यांनी म्हटले आहे की, चायनिज कम्युनिस्ट पक्षाने पाकिस्तानात अत्यंत आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञान तयार केले आहे. याद्वारे नवीन महामारीसाठी पाकिस्तानात एक मोठी प्रयोगशाळा बनला आहे.

चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. पाकिस्तानात या नव्या व्हायरची उत्पत्ती करण्याची जबाबदारी चीनने कोरोनाला जन्माला घालणाऱ्या वुहान लॅबवर सोपविल्याचे या दाव्यात म्हटले आहे. पाकिस्तानची डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉल़ॉजी ऑर्गनायझेशन (डेस्टो) पूर्णपणे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहे.

क्लान यांनी विविध देशांच्या वरिष्ठ गुप्तचर संस्थांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दावा केला आहे की, चीनचे बायो इंजिनिअर कोरोनापेक्षाही कित्येक पटींनी हैदोश घालू शकणारे, घातकी व्हायरस जन्माला घालण्यासाठी सक्षम झाले आहेत.

चीन आणि पाकिस्तानी सैन्याने एकत्र येऊन ही लॅब बनविली आहे. ही लॅब बायोसेफ्टी लेव्हल-४ आहे. लेव्हल-४ ची लॅब ही सर्वात घातक व्हायरससाठी बनविलेली असते. या व्हायरसवर औषध किंवा लस उपचार नसतात.

सिंगापूर विद्यापीठातील जागतिक जैवसंरक्षण तज्ज्ञ डॉ. रायन क्लार्क म्हणाले की, पाकिस्तान आणि चीनच्या या कृत्यांवर लक्ष ठेवले गेले नाही तर ते प्राणघातक विषाणूंद्वारे संपूर्ण जगाचा नाश करतील. यामुळे त्यांच्या या जैविक हत्यारे बनविण्याच्या मनसुब्यांवर लक्ष ठेवले गेले पाहिजे.

ही लॅब अधिकृतपणे चायनीज अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस (CAMS) द्वारे नियंत्रीत केली जात आहे. या लॅबबाबत पहिल्यांदा २०२० मध्ये खुलासा झाला होता. परंतू अद्याप याची दखल जगातील शक्तींनी घेतलेली नाही.