किंग चार्ल्सला नाही आवडलं जगातील सर्वात महागडं घर, आता ३४०० कोटी खर्चून पॅलेसची दुरुस्ती करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 08:51 PM2022-10-18T20:51:27+5:302022-10-18T20:57:31+5:30

ब्रिटनचा नवा राजा चार्ल्स तिसरा याला बकिंगहॅम पॅलेस पसंत पडलेलं नाही. अशा परिस्थितीत महाराजा होऊनही त्यांनी जगातील या सर्वात महागड्या महालात राहण्यास नकार दिला आहे. चार्ल्सचा विश्वास आहे की बकिंगहॅम पॅलेस जितका आधुनिक असायला हवा होता तितका नाही. अशा परिस्थितीत ब्रिटिश राजघराण्याच्या या आलिशान महालात व्यापक बदल केल्यानंतरच राजा चार्ल्स (तिसरा) पॅलेसमध्ये पाऊल ठेवणार आहे.

बकिंगहॅम पॅलेसच्या या फेरबदलाची अंदाजे किंमत 3,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. बकिंगहॅम पॅलेसचे आधुनिकीकरण करण्याचे काम आज सुरू झाले तर किमान पाच वर्षे लागू शकतात. बकिंगहॅम पॅलेसमध्ये ७७५ खोल्या, १८८ कर्मचारी खोल्या आहेत. ज्यात ५२ रॉयल आणि गेस्ट बेडरूम, ९२ ऑफिसेस, ७८ बाथरूम आणि १९ स्टेटरूम आहेत.

द संडे टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, महाराजा चार्ल्स तिसरा हे बकिंगहॅम पॅलेसचे चाहते नाहीत. याआधीही ते अत्यंत मजबुरीनेच या वाड्याला भेट देत असत. आधुनिक जगाला साजेसे भविष्यकालीन घर म्हणून ते योग्य मानत नाहीत.

या महालाचा देखभाल खर्च आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शाश्वत नाही, असे प्रिन्सला वाटते. बकिंगहॅम पॅलेसच्या सूत्राने सांगितले की, त्यांच्या सोयीनुसार पॅलेस अपग्रेड करण्यासाठी 369 दशलक्ष डॉलर्स (रु. 34,35,58,15,110) खर्च अपेक्षित आहे. अशा स्थितीत काम संपेपर्यंत प्रिन्स चार्ल्सचा या राजवाड्यात येण्याचा कोणताही विचार नाही.

बकिंघम पॅलेसच्या सूत्रांनी सांगितले की 2027 पर्यंत प्रिन्सच्या निवासस्थानासाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. या कालावधीसाठी जेवढा व्यवहार्य असेल तेवढाच पॅलेस अधिकृत व्यवसायासाठी वापरला जाईल.

प्रिन्सची पत्नी कॅमिला बकिंगहॅम पॅलेसमध्ये अजिबात राहू इच्छित नाही. त्या आणि राजा चार्ल्स अजूनही क्लॅरेन्स हाऊसमध्ये राहतात. दरम्यान, अशी आशा आहे की राजा चार्ल्स तिसरा बकिंगहॅम पॅलेस लोकांसाठी अधिक खुला करेल

सुत्रांच्या माहितीनुसार चार्ल्स यांना जनतेला राजघराण्याच्या जवळ आणायचे होते. या महालाचा अधिक विकास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांना बकिंगहॅम पॅलेसला आधुनिक युगाच्या तंत्रज्ञानाची जोड द्यायची आहे. राजा चार्ल्सला देखील सामान्य लोकांना त्याच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अधिक स्वातंत्र्य द्यायचं आहे.

प्रिन्स चार्ल्स हे आजवरच्या इतर प्रिन्स आणि सम्राटांपेक्षा लोकांमध्ये अधिक दिसून आले आहेत. ते सार्वजनिक ठिकाणी भेट देत राहतात आणि सामान्य लोकांमध्ये सहजपणे वावरताना दिसतात. त्यामुळे आगामी काळात पॅलेसमध्येही सर्वसामान्यांना सहज प्रवेश मिळू शकेल आणि पॅलेसचं सौंदर्य त्यांनाही जास्तीत जास्त अनुभवता येईल यासाठी प्रिन्स चार्ल्स प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे.