Kabul Airport Blast: 'मारना है या मर जाना है'! काबुल हल्ल्यात शहीद झालेल्या अमेरिकन जवानाची अखेरची पोस्ट, लिहिलंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 05:19 PM2021-08-28T17:19:17+5:302021-08-28T17:25:18+5:30

Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर त्या देशातील नागरिक इतर देशात पलायन करत आहेत. त्यामुळे काबुल एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाहायला मिळत होती.

अफगाणिस्तानात(Afghanistan) तालिबानची(Taliban) दहशत कायम आहे. विविध देश त्यांच्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचवेळी ISIS नं मृत्यूचा खेळ सुरू केला आहे. काबुल एअरपोर्टवर झालेल्या सीरियल ब्लास्टमध्ये १६९ लोकांनी जीव गमावला आहे.

त्याशिवाय या हल्ल्यात १३ अमेरिकन सैन्याचे जवानही शहीद झाले आहेत. यातील एक सैनिक मॅक्सटन विलियम सोविएक होता. नौसेनेचा हा जवान मॅक्सटनने मृत्यूपूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. ज्यात अफगाणिस्तानातील सध्याच्या स्थितीवर भाष्य केले होते.

डेली मेल वेबसाईटनुसार, अमेरिकन नेव्हीचे कॉर्प्समॅन मॅक्सटन विलियम सोविएकने १० जूनला इन्स्टाग्रामवर अखेरची पोस्ट लिहिली होती. ‘मारना है या मर जाना है’ या दोन्ही परिस्थितीत मृत्यू निश्चित आहे. त्यावेळी आपल्या सहकाऱ्यांसोबत मॅक्सटनने एक फोटो शेअर केला होता.

नव्ही कॉर्प्समॅन नेहमी मरीनसोबत काम करतात. ज्यांच्यांकडे स्वत:चे मेडिक्स नसतात. काबुल एअरपोर्टवर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात ११ नेव्ही सैनिकांसोबत लष्कराचा एक जवान शहीद झाला. या हल्ल्यात कमीत कमी १८ अमेरिकन सैनिक जखमी झाले.

सोविएक यांची बहिण मर्लिनने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटलंय की, त्यांचा भाऊ लोकांच्या मदतीसाठी अफगाणिस्तानात गेला होता. त्याच्या जाण्यानं माझं कुटुंब संपलं आहे. आता आम्ही कधीही पहिल्यासारखं जगू शकत नाही. तो एक मुलगा होता. आम्ही आमच्या मुलांना मरण्यासाठी तिथे पाठवत आहोत.

मॅक्सटन सोविएक हा त्या ६ हजार अमेरिकन सैन्यापैकी एक होता जो काबुलमधून अमेरिकन आणि अफगाण नागरिकांना तिथून काढण्यासाठी काम करत होता. काबुल एअरपोर्टवर ISIS च्या आत्मघातकी हल्ल्यानंतर अमेरिकेनेही जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. ड्रानच्या माध्यमातून एअरस्ट्राइक करत अमेरिकन सैन्याने ISIS च्या दहशतवाद्यांवर हल्ला केला आहे.

एका न्यूज एजेन्सीनुसार, अमेरिकेने रात्री १२ च्या सुमारास नंगरहारच्या पूर्व भागात एका घरात स्फोटक ड्रोनचा हल्ला केला. या हल्ल्यात घरावरील पत्रे उडाले आणि त्याठिकाणी उभी वाहनंही उद्ध्वस्त झाली. काबुल ब्लास्टनंतर अमेरिकेने या हल्ल्यातील दोषींना माफ करणार नाही. याचा बदला घेऊ असा इशारा राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी दिला होता.

काबुलमध्ये विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ खुरासन प्रोविंस (ISKP) या दहशतवादी घेतली होती. दरम्यान, या संघटनेमध्ये केरळमधील १४ जणांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार तालिबान आणि त्यांचे सहकारी या कट्टरवाद्यांचा वापर करून भारताच्या प्रतिमेला नुकसान करू शकतात. तसेच तुर्कमेनिस्थानच्या दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट करण्याच्या प्रयत्नात दोन पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेतले होते. मात्र तालिबानने अद्याप या प्रकरणात मौन धारण केले

अफगाणिस्तामधून येत असलेल्या रिपोर्टनुसार काबुल हक्कानी नेटवर्कच्या नियंत्रणाखाली आहे. कारण पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या नंगरहार प्रांतामध्ये आदिवासी बहुल भागात जादरान पश्तून जलालाबाद-काबूलमध्ये प्रभावी आहे.

Read in English