चीनने अंतराळात शोधले एलिअन्स? सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपला मिळाले अनोखे संकेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 03:02 PM2022-06-16T15:02:49+5:302022-06-16T15:08:51+5:30

China Cliam on Alien : चीनी वैज्ञानिकांच्या टीममध्ये बीजिंगची नॉर्मल यूनिव्हर्सिटी, चायना अकादमी ऑफ सायन्सेज आणि यूनिव्हर्सिटी ऑफ बार्कलेच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे.

जगभरात एलिअन्सबाबत रोज काहीना काही चर्चा होत असते. वैज्ञानिक दररोज एलिअन्सबाबत काहीना काही दावा करत असतात. ज्यावर विश्वास ठेवण अवघड असतं. लोकही कधी कधी एलिअन्स आणि यूएफओ बघितल्याचा दावा करतात. पण खरंच अंतराळात एलिअन्स आहेत? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी वैज्ञानिक अनेक वर्षांपासून काम करत आहेत. पण अजूनही त्यांच्या हाती ठोस असं काही लागलं नाही.

आता चीनच्या महाशक्तीशाली स्काय आय टेलिस्कोपने असे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल शोधले आहेत जे आधी मिळालेल्या संकेतांपेक्षा वेगळे आहेत. वैज्ञानिक याला पृथ्वीबाहेर जीवन असल्याचे संकेत मानत आहेत. आता चीनमधील वैज्ञानिक पुढे शोध घेत आहेत.

चीनच्या सरकारी सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी डेलीने हा रिसर्च प्रकाशित केला आहे. पण नंतर हा हटवण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये मुख्य वैज्ञानिक झांग टोंजिए यांच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, पृथ्वीवर बाहेर जीवन असल्याचं संकेत आढळून आले आहेत.

चीनी वैज्ञानिकांच्या टीममध्ये बीजिंगची नॉर्मल यूनिव्हर्सिटी, चायना अकादमी ऑफ सायन्सेज आणि यूनिव्हर्सिटी ऑफ बार्कलेच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. झांग यांनी हे संकेत एकप्रकारचे रेडिओ इंटरफेरेंस असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, आणखी शोधाची गरज आहे.

हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही की, चीन सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी डेली वेबसाइटवरून हा रिपोर्ट डिलीट का केला. चीनच्या विज्ञान मंत्रालयाचं हे अधिकृत वृत्तपत्र आहे. चीनमध्ये ही बातमी सोशल नेटवर्क बीबोवर ट्रेन्ड झाल्यानंतर डिलीट केली होती.

चीनने सिंगल-अपर्चर टेलिस्कोपला अधिकृतपणे जगभरातील वैज्ञानिकांसाठी ओपन केली आहे. चीन ही जगातील सर्वात संवेदनशिल टेलिस्कोप असल्याचा दावा करते.

चीनने याआधीही असे दावे केले आहेत. चीनने 2019 मध्ये दोन समूहांचा शोध घेतला होता, ज्यात संकेत मिळाले होते. पण त्यावेळी एलिअन्स असल्याची कोणतीही ठोस माहिती दिली नव्हती. पण याचे संकेत सांगितले होते. आता चीनने पुन्हा एकदा दुसऱ्या विश्वाचा दावा केला आहे.