'या' लक्षणांवरून जाणून घ्या तुमचं लिव्हर होत आहे डॅमेज, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 12:34 PM2024-03-02T12:34:36+5:302024-03-02T12:57:09+5:30

Liver Damage Symptoms : लिव्हरसंबंधी आजारांची वेगवेगळी कारणे आहेत. लोकांना असं वाटतं की, केवळ दारूचं सेवन जास्त केल्याने लिव्हर खराब होतं. पण असं नाहीये.

लिव्हर खराब झालं तर डायजेस्टिव सिस्टीममध्ये समस्या होते. लिव्हर शरीराला संक्रमणासोबत लढणं, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणं, शरीरातील ब्लड शुगर कंट्रोल करणं आणि कार्बोहायड्रेटला स्टोर करण्यापासून ते प्रोटीन बनवण्यास मदत करतं. लिव्हर मजबूत असेले तर शरीर फीट राहतं आणि ते कमजोर झाल्यावर शरीर कमजोर होतं.

लिव्हरसंबंधी आजारांची वेगवेगळी कारणे आहेत. लोकांना असं वाटतं की, केवळ दारूचं सेवन जास्त केल्याने लिव्हर खराब होतं. पण असं नाहीये. लिव्हरच्या समस्या अचानक होतात. महत्वाची बाब म्हणजे सुरूवातीला यांची काही लक्षणे दिसत नाहीत. पण पुढे जाऊन ते गंभीर रूप घेतात. तरीही काही लक्षणांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विष्ठेचा रंग बदलणे - जर तुमच्या लिव्हरमध्ये काही गडबड असेल तर लिव्हरमध्ये तयार होणारे बाइल सॉल्ट्समुळे विष्ठेचा रंग गडद होतो. ज्याचा अर्थ हा होतो की, तुमचं लिव्हर हेल्दी आहे. पण लिव्हरमध्ये काही समस्या झाली तर लिव्हर फॅट पचवू शकत नाही, ज्यामुळे विष्ठा पातळ येते आणि रंगही हलका होतो.

उलटी आणि मळमळ - मळमळ होणे हे लिव्हरमध्ये गडबड असल्याचं फारच सामान्य लक्षण आहे. कारण या स्थितीत लिव्हर विषारी पदार्थांना फिल्टर करू शकत नाही आणि हे विषारी पदार्थ रक्त प्रवाहात जमा होऊ लागतात. ज्यामुळे मळमळ होते.

काही खाल्ल की टॉयलेटला जाणे - गॅस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्स कोणता आजार किंवा मेडिकल कंडीशन नाही. तर ही एक फिजोयोलॉजिकल रिफ्लेक्स म्हणजे अॅक्शन आहे. या स्थितीत काहीही खाल्ल्यावर टॉयलेटला जाण्याची इच्छा होते.

त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा - जर तुमच्या लिव्हरमध्ये समस्या असेल तर त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा दिसू लागतो. हे रक्तातील बिलीरूबिन नावाच्या केमिकलमुळे होतं. एखाद्या समस्येमुळे लिव्हर याला योग्यपणे प्रोसेस नाही करू शकत, त्यामुळे शरीरात हे संकेत दिसू लागतात. लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर खाजही येते.

जखमा लवकर न भरणे - लिव्हर खराब झाल्यावर ते प्रोटीन निर्माण करू शकत नाही. त्यामुळे तुमच्या ब्लड वेसल्सला सहजपणे इजा होतात. हे डायबिटीसचंही एक मुख्य लक्षण आहे.

लघवीचा रंग बदलणे - लिव्हरमध्ये काही समस्या झाली तर बिलीरूबिन केमिकल तुटत नाही ज्यामुळे याचं प्रमाण लिव्हरमध्ये वाढू लागतं. त्यामुळे लघवीचा रंग बदलतो. लिव्हरमध्ये समस्या असेल तर लघवीचा रंग गर्द पिवळा होतो.

पोट फुगणे - पोट फुगणं हा लिव्हरमध्ये समस्या असण्याचा संकेत आहे. या स्थितीत पोटात फ्ल्यूइड भरू लागतं. ज्याला सामान्य भाषेत पोटात पाणी भरणं म्हटलं जातं. या आजारात लोकांना पायावर, टाचांवर सूज येते.