या सात खाद्य पदार्थांच्या मदतीने आपली दृष्टी राखा सतेज आणि निरोगी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 12:06 AM2017-08-19T00:06:06+5:302017-08-19T00:11:05+5:30

बदामात विटामिन ई असते जे डोळ्यांना अतिशय लाभकारक आहे. हे शरीरातील पेशींना ऑक्सीडेशन पासून वाचवते आणि मोतीबिंदू तसेच वयोमानामुळे दृष्टी कमी होणे टाळते.

रोज किमान एक गाजर किंवा एक रताळे खावे. थोड्या ओलिव्ह तेलात परतावं. त्यामुळे त्या भाज्या लवकर विरघळतात आणि शरीराला पोषक ठरतात.

पालक आणि ब्रोकोली सारख्या भाज्यांमध्ये जीक्सान्त्हीन आणि लूटीनसारखे घटक असतात त्यामुळे मोतीबिंदू आणि दृष्टी कमी होण्यात लाभ होतो.

संत्र्यामध्ये विटामिन सी असते. एका संशोधनानुसार ज्या महिला सलग १० वर्षे विटामिन सी चे सेवन करतात, त्यांच्यामध्ये मोतीबिंदूचे प्रमाण ६४%नी कमी आले आहे.

गडद रंगाच्या बेरीज जसं की ब्लू-बेरी आणि ब्लाकबेरीज मध्ये अन्थोसयानीन असते त्यामुळे मोतीबिंदू आणि दृष्टी कमी होण्याने येणारा आंधळेपणा रोखला जातो.

नियासिन आणि विटामिन ई मुळे वयाबरोबर दृष्टी कमी होण्याचा धोका कमी करते आणि बरोबरच केस आणि त्वचेच्या आरोग्यासही उपयुक्त आहे. दिवसातून किंन एकदा तृणधान्यांचे सेवन करावे.

विटामिन ई आणि झिंक यांचा एक उत्तम स्त्रोत असल्याने सूर्यफुलाच्या बियांचे सेवन हे डोळ्यांना निरोगी ठेवतात.