Corona Virus : श्वास घेण्यास त्रास, थकवा... कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यावर आढळतात 'ही' लक्षणं, आजारांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 11:50 AM2022-09-09T11:50:40+5:302022-09-09T12:04:22+5:30

Corona After Effects: कोरोनाचा थेट परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. जगभरातील रुग्णांची संख्या तब्बल 61 कोटी झाली असून रुग्णसंख्या 612,654,720 आहे. तर 6,512,640 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 590,602,150 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. असं असताना कोरोना सातत्याने सर्वांचीच चिंता वाढवत आहे.

कोरोनाचा थेट परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. त्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. आरोग्य तज्ज्ञ अजूनही यावर संशोधन करत आहेत. याच दरम्यान, एका संशोधनात कोरोनाचा दीर्घकाळ परिणाम आढळून आला आहे. म्हणजेच कोरोना नंतरची समस्या ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही त्याची लक्षणे 180 दिवस टिकू शकतात. यामुळे तुम्हाला थकवा, तणाव, शरीरात तणाव जाणवेल. दुसरीकडे, पुरुषांसाठी हे आणखी गंभीर आहे कारण त्याचा त्यांच्या प्रजनन क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तज्ञांचे म्हणणे आहे की कोविड नंतर 10 महिने देखील, उच्च बीएमआय, डिस्लिपिडेमिया आणि कमी शारीरिक सहनशक्ती कायम राहू शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इतके दिवस सारखी राहत नाही. अशा परिस्थितीत कोरोनामधून बरे होऊनही लोकांनी गाफील राहू नये.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील कोविड नंतरची लक्षणे गंभीर मानली आहेत. हे धोकादायक देखील आहे कारण शरीरात कोविड नंतरची लक्षणे आहेत हे बऱ्याच काळापासून माहित नाही. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

थकवा, धाप लागणे किंवा स्मरणशक्ती कमी होणे, झोपेची समस्या, खोकला, छातीत दुखणे, बोलण्यात अडचण, स्नायू दुखणे, वास न येणं किंवा चव कमी होणे, नैराश्य, ताप आणि शरीरातील वेदना ही सामान्य लक्षणे आहेत. कोणतंही लक्षण जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

ज्या लोकांना कोरोना संसर्गादरम्यान गंभीर लक्षणे दिसतात त्यांना कोरोनानंतरही इतर आजार होण्याची शक्यता असते. तुम्हालाही कोरोना झाला असेल आणि बरे झाल्यानंतरही तुम्हाला समस्या येत असतील, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. लक्षणांकडे दुर्लक्ष करणे जीवघेणं ठरू शकतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.