Causes of Cholesterol: पोटात जाताच भयंकर कोलेस्ट्रॉल बनवतात हे 5 पेय पदार्थ, कधीही येऊ शकतो Heart Attack

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 01:02 PM2023-02-20T13:02:27+5:302023-02-20T13:15:50+5:30

Cholesterol : शरीराच्या चांगल्या क्रियांसाठी याची गरज असतेच, पण रक्तात जेव्हा याचं प्रमाण वाढतं. तेव्हा मात्र मोठी समस्या होते.

कोलेस्ट्रॉल (Cholesterol) ची समस्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. सगळ्याच वयोगटातील लोक याचे शिकार होत आहेत. कोलेस्ट्रॉल एक मेणासारखा चिकट पदार्थ असतो जो रक्तात आढळून येतो. आपलं लिव्हरही हा पदार्थ तयार करतं आणि आपण खाल्लेल्या अनहेल्दी फूडनेही हा पदार्थ तयार होतो. शरीराच्या चांगल्या क्रियांसाठी याची गरज असतेच, पण रक्तात जेव्हा याचं प्रमाण वाढतं. तेव्हा मात्र मोठी समस्या होते.

कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून बसलेलं असतं. यामुळे रक्तप्रवाह स्लो होतो. अर्थातच याने छातीत वेदना, कोरोनरी डिजीज, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या जीवघेण्या आजाराचा धोकाही होऊ शकतो. चला जाणून घेऊ कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं आणि यापासून बचाव कसा करायचा.

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं वेगवेगळी असतात. पण याचं मुख्य कारण फॅट असलेल्या पदार्थांचं सेवन सांगितलं जातं. एक्सरसाइज न करणं हेही कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण आहे. खाण्या-पिण्याबाबत सांगायचं तर सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं. असेल अजून काही पदार्थ आहेत ज्यांचं सेवन तुम्ही रोज केलं तर कोलेस्ट्रॉल अधिक वाढतं.

दारू - ​heartuk.org.uk च्या रिपोर्टनुसार, जेव्हा तुम्ही मद्यसेवन करता तेव्हा त्यापासून लिव्हरमध्ये ट्राइग्लिसरायड्स आणि कोलेस्ट्रॉल तयार होतं. त्यामुळे मद्यसेवन केल्यावर रक्तात ट्राइग्लिसरायड्स आणि कोलेस्ट्रॉल वाढतं. मद्यसेवन कमी केलं तर तुम्हाला कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर मद्यसेवन सोडलं तर तुमचं आरोग्य अधिक चांगलं होतं. तसेच तुम्हाला कोणताही हृदयरोग होणार नाही.

पाम ऑइल - ​NCBI वर प्रकाशित एका रिसर्चनुसार, पाम ऑइलमध्ये इतर वनस्पती तेलांच्या तुलनेत जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट आढळून येतं आणि याचं नियमित सेवन केलं तर बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढतं.

सोडा - जर तुम्ही नेहमीच सोड पीत असाल तर लगेच बंद करा. एका शोधानुसार, जे वयस्क लोक दररोज कमीत कमी एक गोड पेय पित असतील तर त्यांच्यात डिस्लिपिडेमिया (हाय कोलेस्ट्रॉल) विकसित होण्याचा अधिक धोका असतो. ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

कोल्ड ड्रिंकसारखे गोड पेय पदार्थ - आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि या दिवसात कोल्ड ड्रिंक्स व पॅकेज ज्यूसचं सेवन जास्त केलं जातं. या पेयांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे अनहेल्दी फॅटचं प्रमाण वाढतं. रिसर्चनुसार, जास्त साखर असलेल्या ड्रिंक्समुळे हाय ट्राइग्लिसरायड्स (खराब कोलेस्ट्रॉल) जास्त वाढतं.

फुल क्रीम आणि फॅट असलेलं दूध - हेल्थलाइनच्या एका रिपोर्टनुसार, फुल फॅट असलेल्या डेअरी उत्पादनांच्या सेवनामुळे तुमचं एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढतं. याचं कारण यात सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जास्त क्रीम असलेल्या दुधापेक्षा साधं दूध वापरा.