Diabetes tips: टाईप २ डायबिटीज आहे गंभीर, म्हणूनच समजून घ्या त्याची लक्षणे, वेळीच करता येतील उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 05:35 PM2022-03-08T17:35:38+5:302022-03-08T17:53:22+5:30

डायबिटीज म्हटल्यावर अनेकांना भीती वाटते. हा आजार गंभीर असला तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही. या आजाराची लक्षणे जाणून घेतल्यास तुम्ही त्यावर योग्य ते उपचार करु शकता.

जगभरातच सध्या ‘टाइप-२ डायबिटीज’च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तब्बल ५३ कोटी ज्येष्ठ नागरिकांना हा त्रास आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१९ मध्ये या आजारामुळे जगभरात १५ लाख लोकांचा मृत्यू झाला. जाणून घेऊ या आजाराविषयी...

टाइप-२ डायबिटीज हा काही गंभीर आजार नाही. या आजारात रुग्णाच्या ब्लड शुगरच्या प्रमाणात वाढ होते. वेळीच योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो.

वारंवार लघवी होणे हे डायबिटीजचे मुख्य लक्षण आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक होते तेव्हा किडनी अधिकाधिक साखर फिल्टर करण्याचे प्रयत्न करते. या प्रक्रियेमुळे वारंवार लघवी होते. रात्री हे प्रमाण अधिक असते.

लघवीच्या प्रमाणात वाढ झाल्याने तहान लागण्याचे प्रमाण वाढते.

टाइप-२ डायबिटीजचे आणखी एक लक्षण म्हणजे, भूक वाढणे. रुग्णाने कितीही खाल्ले तरी त्यातून शरीराला अपेक्षित ऊर्जा मिळत नाही. पचनयंत्रणा अन्नाचे रुपांतर ग्लुकोजमध्ये करते.

रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या नसांना इजा पोहोचू शकते. त्यामुळे दोन्ही डोळ्यांनी अंधुक दिसण्यास सुरुवात होऊ शकते. वेळीच योग्य वैद्यकीय उपचार प्राप्त न झाल्यास अंधत्व येऊ शकते.

डायबिटीज रुग्णाला जखम  झाल्यास लवकर बरी होत नाही. रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण रक्तवाहिन्यांना कमकुवत करते त्यामुळे जखम भरण्यास वेळ लागतो. यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो. संसर्गाचाही धोका निर्माण होतो.

रक्तातील जादा साखरेमुळे यिस्टना त्यांचे खाद्य प्राप्त होते. यिस्टचा संसर्ग शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो. त्यामुळे खाज सुटण्याचे प्रमाण वाढते.

६४.३०कोटी  लोकांना २०३० पर्यंत जगभरात टाइप २ डायबिटीज असेल. जगभरात १० पैकी १ जण मधुमेहाने ग्रस्त आहे.