दूध किंवा चहा माशी पडल्यावरही पिऊ शकता का? मेडिकल सायन्सच्या उत्तराने बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 11:32 AM2023-09-07T11:32:26+5:302023-09-07T11:47:27+5:30

Fly in Food Side Effects: याबाबत मेडिकल सायन्सचं काय मत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? माशील पडल्यावरही एखादं पेय किंवा पदार्थ खाण्यालायक राहतो का?

अनेकदा दुधात, चहात किंवा एखाद्या पदार्थात माशी पडणं कॉमन आहे. बरेच लोक माशी पडलेले पदार्थ फेकून देतात. पण याबाबत मेडिकल सायन्सचं काय मत आहे हे तुम्हाला माहीत आहे का? माशील पडल्यावरही एखादं पेय किंवा पदार्थ खाण्यालायक राहतो का?

माशी ज्याही गोष्टीवर बसते, ती गोष्टी खतरनाक इन्फेक्शनने संक्रमित होऊ शकते. तसेच ज्या पदार्थात किंवा पेयात माशील पडते तेव्हा त्यात घातक बॅक्टेरिया-व्हायरस पसरू शकतात.

हा आहे मुख्य बॅक्टेरिया - Pubmed वर प्रकाशित रिपोर्टनुसार, माशीमध्ये काही बॅक्टेरिया ट्रांसफर करण्याची क्षमता असते. ज्यात ई, कोलाई, लिस्टेरिया, शिगेला आणि साल्मोनेला मुख्य आहेत.

फूड पॉयजनिंगचा धोका - सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅंड प्रीवेंशननुसार, हे बॅक्टेरिया गंभीर इन्फेक्शन निर्माण करू शकतात. शरीरात पोहोचल्यावर यात फूड पॉयजनिंग होऊ शकते.

फूड पॉयजनिंगची लक्षण - फूड पॉयजनिंगमुळे रूग्णाला डायरिया, पोटदुखी, क्रॅम्प, मळमळ, उलटी आणि तापसारखी लक्षणे दिसू शकतात.

ही लक्षण दिसताच डॉक्टरकडे जा - जर तुम्हाला तीन दिवसांपेक्षा जास्त डायरिया, 102 ताप, बघण्यात आणि बोलण्यात समस्या, डिहायड्रेशन किंवा लघवीतून रक्त येत असेल तर जराही वेळ न घालवता डॉक्टरांकडे जा.

याचीही घ्या काळजी - फूड पॉयजनिंगमुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे पुरेसं पाणी आणि ओआरएसच्या पाण्याचं सेवन करा. सोबतच भरपूर आराम करा आणि लक्षणं कमी करणारी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.